इनोव्हा कारच्या धडकेत सहा वाहनांचे नुकसान
12:47 PM May 28, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
त्यावेळी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भरधाव आलेल्या गोवा पासिंगच्या इनोव्हा कारने दुकानासमोर उभ्या केलेल्या मिनी गुड्स रिक्षासह पाच दुचाकींना धडक दिली. धडक दिल्यानंतर इनोव्हा कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा थेट दुकानात शिरली. या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्रीदेखील कॉलेज रोडवरील एका रुग्णालयासमोर गोवा पासिंगच्या इनोव्हाने तीन कार व एका दुचाकीला धडक दिली होती. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सदाशिवनगर येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच उत्तर रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. मात्र याप्रकरणी तक्रार देण्यास कोणीच पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Advertisement
सदाशिवनगर येथील घटनेत पाच दुचाकींसह गुड्स वाहनाचे नुकसान : शहरात सलग दुसरी घटना
Advertisement
बेळगाव : कॉलेज रोडवर भरधाव कारने ठोकरल्याने वाहनांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री सदाशिवनगर येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. रात्री 12 च्या सुमारास गोवा पासिंगच्या एका इनोव्हा कारने पाच दुचाकी आणि एका मिनी गुड्स रिक्षाला जोरदार धडक दिल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच उत्तर रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र या अपघाताची नोंद पोलिसात न झाल्याने अधिक तपशील समजू शकला नाही. सदाशिवनगर येथील अंकुश पानशॉपसमोर वाहने पार्क करण्यात आली होती.
Advertisement
Advertisement
Next Article