For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 130 घरांचे 44 लाखांचे नुकसान

01:05 PM Jun 19, 2025 IST | Radhika Patil
जिल्ह्यात 130 घरांचे 44 लाखांचे नुकसान
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

जिह्यात या हंगामात जोरदारपणे सुरू असलेल्या मान्सूनच्या कालावधीत निर्माण झालेल्या आपत्तीच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले. आतापर्यंत जिल्ह्dयातील अंशत: आणि पूर्णत: अशा एकूण 130 घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान तर सार्वजनिक मालमत्तांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

यावर्षी मान्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. काही घटनांत जीवितहानीही झाली. या पावसाच्या कालावधीत पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर संरक्षक भिंत कोसळून व अन्य घटनांमध्येही पाच जण जखमी झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या बाबतचा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Advertisement

जिल्ह्dयात मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीमध्ये अंशत: कच्च्या 2 घरांचे 93 हजाराचे तर अंशत: 128 पक्क्या घरांचे सुमारे 43 लाखाचे नुकसान झाले. तसेच तीन पूर्णत: गोठ्यांचे 71 हजार व 13 अंशत: गोठ्यांचे 6 लाख 26 हजार एवढे नुकसान झाले. पशुधनामध्ये 1 जनावर दगावले. एनडीआरएफचे 1 पथक रत्नागिरीत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. जिह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने इशारी पातळीवर वाहणाऱ्या नद्यांचे पाणीही ओसरले आहे. अनेक ठिकाणी आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

  • जिल्ह्यातील पर्जन्यमान व झालेल्या नुकसानीच्या ठळक बाबी :

-आजपर्यंत सरासरी 1043.39 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

-वीज पडून राजेश चिमाजी जाधव (45, गोविळ, ता. लांजा) यांचा मृत्यू.

-राजेंद्र सोनू कोळंबे (49, वणंद, ता. दापोली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू.

-काजरघाटीत दरड कोसळून आणि आबलोली मार्गावर झाड पडून 5 जण जखमी.

-जि.प., सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पाणीपुरवठा विभागाचे मिळून 1 कोटी 13 लाखाहून अधिकचे नुकसान.

- जि.प. शाळांचे सव्वा लाखांचे, अंगणवाड्यांचे 20 हजार, जि. प. बांधकाम
विभागांतर्गत रस्ते व संरक्षक भिंतींचे सर्वाधिक 53 लाखांचे नुकसान.

-पूल, मोऱ्या, कॉजवेचे दीड लाखाहून अधिक, साकवांचे 32 हजाराचे नुकसान.

- सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते व संरक्षक भिंतीचे 27 लाखाहून अधिक,
पूल व मोऱ्यांचे 5 लाखाचे नुकसान.

-महावितरणचे 18 लाखांचे तर पाणीपुरवठा विभागाचे साडेसहा लाखांचे नुकसान.

  • अजूनही कुणाला स्थलांतरांच्या नोटिसा नाहीत

जिल्ह्यात दरडप्रवण क्षेत्र आणि पूरप्रवण क्षेत्र यापैकी जिह्यातील एकाही कुटुंबाला स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आलेल्या नाहीत. साधारण जुलैमध्ये अतिवृष्टीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतराच्या नोटिसा देण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतराबाबतचा रकाना अहवाल कोरा आहे.

Advertisement
Tags :

.