महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कसबा नंदगड येथे घराची भिंत पडून नुकसान

10:49 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

कसबा नंदगड ता. खानापूर येथे गुरुवारी पहाटे घराची भिंत पडून नुकसान झाले आहे. जवळपास 30 फूट लांब व 18 फूट रुंदीची भिंत होती. घर पत्र्याचे होते. यामध्ये घर मालक श्रीकांत बरगावकर यांचे सुमारे तीन लाख रु. चे नुकसान झाले आहे. या घरात श्रीकांत बरगावकर यांचे बंधू किरण बरगावकर आपली पत्नी, मुलाबाळासह रहात होते. भिंत पडली त्यावेळी ते गाढ झोपले होते. भिंत बाहेरच्या बाजूने पडल्याने घरात झोपलेले सुदेवाने बचावले. या भागात दमदार पाऊस पडत असून अती पावसामुळे घरांच्या भिंती पडून नुकसान होण्याचे सत्र सुरुच आहे. घराची भिंत पडल्याने घरात पावसाचे पाणी शिरुन घरातील संसारपयोगी साहित्याचे भिजून नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article