For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Paranda Water Crisis | धरण उशाला अन् कोरड घशाला! परंडा शहरात उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

05:40 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
paranda water crisis    धरण उशाला अन् कोरड घशाला  परंडा शहरात उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती
Advertisement

.                          कल्याणसागर धरणात पाणी असूनही परंडा तहानलेले

Advertisement

परंडा -शहरातील नागरिकांना उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंडा शहराजवळ धारशिव जिल्ह्यातील कल्याणसागर हे मोठे धरण परंडा शहराजवळ आहे. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असताना देखील शहरास तीन ते चार दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो. तो ही कमी दाबाने त्यामुळे येणारे पाणी मोठ्या कुटुंबांना पुरत नाही

परंडा शहरास पाणीपुरवठा तीन ठिकाणाहून करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. त्या पैकी सीना जॅकवेल व खासापुरी मध्यम प्रकल्प या दोन्ही ठिकाणावरून यापूर्वी पाणीपुरवठा होत होता. पण
उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ सध्या या दोन्ही पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बंद अवस्थेत असल्याचे समजते.

Advertisement

त्यामुळे सध्या परंडा शहरास सीना कोळेगाव प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. या पुरवठ्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर शहरास पाणी मिळत नाही. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात हातपंप असून ते देखील बंद अवस्थेत आहेत. या बाबतीत नागरिकांनी सांगून देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे. तेव्हा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या सीना जॅकवेल व खासापुरी प्रकल्पावरील बंद पडलेल्या योजना दुरुस्ती करून त्या ठिकाणावरून देखील पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच पाणी शहरास एक दिवसाआड देण्यात यावे,अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन शहरात होत असलेली पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे

Advertisement
Tags :

.