धरणातून विसर्ग वाढला, पातळीत वाढ
सांगली :
कोकण व पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढत आहे. हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाने धरणांतून नियोजित व नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरणात २६.७० टीएमसी, कोयना धरणात ६१.५२ आणि अलमट्टी धरणात ८७.६१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
अलमट्टी धरणातून एक लाख ७८० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. कोयना, कनेर, कुरमोडी, वारणा, राधानगरी आणि शेतकरी धरणांमधून देखील नियोजित प्रमाणात पाणी सोडले जात आहे. या विसर्गामुळे कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. काही भागांत 'रेड अलर्ट' लागू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत.
आयर्विन पूल सांगली येथे १६.९ फुट पाणी पातळी असून इशारा पातळी ४० फुट आहे. अंकली पूल, हरिपूर येथे १९.१० फुट पाणी पातळी असून ४५.११ इशारा पातळी आहे.
- शिराळा तालुक्यात १६. ३ मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक १६.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे मिरज ४.४ (१२४.४), जत १.२ (९०.५), खानापूर-विटा ०.९ (९५.८), वाळवा-इस्लामपूर ३.५ (२१५.३), तासगाव १.५ (११४), शिराळा १६.३ (५२०.१), आटपाडी ०.६ (९०.२), कवठेमहांकाळ १.८ (१००.६), पलूस १.६ (१७९.१), कडेगाव ३.३ (१४६.४).
- धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टी. एम. सी. मध्ये
कोयना धरण ६१.५२ (१०५.२५), धोम ८.९२ (१३.५०), कन्हेर ७.२९ (१०.१०), धोम बलकवडी १.६६ (४.०८), उरमोडी ७.२३ (९.९७), तारळी ४.६३ (५.८५), वारणा २६.७० (३४.४०), राधानगरी ६.०९ (८.३६), दूधगंगा १४.६५ (२५.४०), तुळशी २.४४ (३.४७), कासारी १.९६ (२.७७), पाटगांव ३.०९ (३.७२), अलमट्टी धरणात ८७.६१ पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टीएमसी इतकी आहे.
- विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे
कोयना १०५०, कण्हेर २९९७, उरमोडी २१९१, वारणा १६३०, राधानगरी ३१००, दुधगंगा १६००, तुळशी ३००, कासारी ७००, पाटगाव २५०, हिप्परगी बॅरेज ९३४६२ व अलमट्टी १ लाख ७८० क्युसेक्स