For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala | पन्हाळा तहसीलवर दलित महासंघाचे 'कागद फाड' आंदोलन; सातवे येथील प्लॉटधारकांसाठी एल्गार

02:52 PM Mar 29, 2026 IST | NEETA POTDAR
panhala   पन्हाळा तहसीलवर दलित महासंघाचे  कागद फाड  आंदोलन  सातवे येथील प्लॉटधारकांसाठी एल्गार
Advertisement

            पन्हाळा तालुक्यातील वाढीव गावठाण प्लॉटसाठी कागद फाड आंदोलन

Advertisement

पन्हाळा -पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील वाढीव गावठाण प्लॉट धारकांना १९९१ साली दिलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातबारा उताऱ्यावर तात्काळ नावे दाखल करण्यात यावी. या मागणीसाठी दलित महासंघाच्या (वायदंडे गट)वतीने राज्याध्यक्ष डॉ सुधाकर वायदंडे व राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा तहसील कार्यालयासमोर तीव्र 'कागद फाड आंदोलन' करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय वळवी,विजय जाधव यांना देण्यात आले. तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून पुढील कार्यवाही करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले.

दरम्यान आठ दिवसांत ठोस कार्यवाही करून संबंधित प्लॉट धारकांची नावे सातबारा उताऱ्यावरती न नोंद झाल्यास दलित महासंघाच्या वतीने 'तिरडी आंदोलन' छेडण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.

डॉ.सुधाकर वायदंडे म्हणाले, संघटनेच्या वतीने गेल्या ६ महिण्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा असून याकडे अधिकाऱ्यानी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला डावलण्याचा तालुका प्रशासनाने प्रयत्न केलेला आहे.सर्कल यांनी सदर प्लॉटची स्थळ पाहणी करून दीड महिन्यांनी तहसीलदार यांच्याकडे ४ डिसेंबर रोजी सादर केला.पंचनामा सादर होऊन तीन महिने झाले तरी प्रशसनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही यावरून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सबंधित लोकांच्यावरती अन्याय करत आहे.

Advertisement

प्लॉट धारकांची उताऱ्यावरती आठ दिवसांत नावे नोंद न केल्यास तिरडी आंदोलन अधिक तीव्रतेने होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे डॉ. वायदंडे यांनी शेवटी सांगितले.यावेळी दलित महासंघाचे प.महा अध्यक्ष सदाभाऊ चांदणे,युवक आघाडी प.महा कार्याध्यक्ष सागर लोंढे, सांगली युवक जि.कार्याध्यक्ष अमोल लोखंडे,युवक पन्हाळा ता.अध्यक्ष प्रशांत डोईफोडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष गोरख सावंत,संभाजी पाटोळे, बजरंग सावंत,आदर्श कुंभार,प्रविण शिंदे,राहुल खोचिकर,स्वप्नील शेटे,मोहन निकम,आनंदा पाटील,युवराज जाधव यांच्यासह प्लॉट धारक मोठया संख्येने उपस्थित होते

Advertisement
Tags :

.