For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणकावळेत गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिणायन भ्रमण उत्सवाचे आयोजन

कुणकावळेत गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिणायन भ्रमण उत्सवाचे आयोजन
Advertisement

चौके/प्रतिनीधी : श्री स्वामी समर्थ मठ, श्रीक्षेत्र कुणकावळे येथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री स्वामी समर्थ मूर्ती संकल्पाप्रमाणे दक्षिणायन भ्रमण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून दक्षिण दिशेचा दरवाजा श्री स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येणार असून, श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनापासून दर्शनासाठी उघडलेला हा दक्षिण दिशेचा दरवाजा आज बंद करण्यात येणार आहे.

Advertisement

श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना करताना दक्षिणायन भ्रमण व उत्तरायण भ्रमण असा संकल्प करण्यात आला होता. आशिया खंडात अशा स्वरूपाचा धार्मिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केला जात असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दक्षिणायन भ्रमण कार्यक्रमाचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, श्रीक्षेत्र कुणकवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मूर्ती संकल्पाप्रमाणे दक्षिणायन भ्रमण, दुपारी १२ वाजता गुरुपौर्णिमा पूजन, अभिषेक व महाआरती, तसेच दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थांना गुरु मानून गुरुदीक्षा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १.३० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

सायंकाळी ४ ते ७ या वेळेत २०२३ च्या अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त समाजसेविका, लेखिका, कवयित्री व कीर्तनकार ह.भ.प. सौ. वर्षा राणी बलवंत अभ्यंकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा, तसेच रात्री ९.३० वाजेपर्यंत आरती व नामस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या गुरुपौर्णिमा उत्सवात सर्व स्वामी भक्तांनी सहभागी व्हावे तसेच कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, श्रीक्षेत्र कुणकवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.