For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्ष, स्नेहा, सक्षम, मथुरा, सिद्धनगौडा, समृद्धी विजेते

09:55 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
दक्ष  स्नेहा  सक्षम  मथुरा  सिद्धनगौडा  समृद्धी विजेते
Advertisement

कंग्राळी खुर्द स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धा

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी खुर्द येथील स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स कंग्राळीचा दक्ष पाटील तर स्नेहा हिरोजी, सक्षम मरगाळे, मथुरा जाधव, सिद्धनगौडा पाटील, व समृद्धी दळवी आदींनी विविध गटात विजेतेपद पटकाविले. या स्पर्धात सहभागी धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा प्रारंभी जवान जयदेव उदगट्टी, ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर ग्रा. पं. अध्यक्षा दोडव्वा माळगी यांच्या हस्ते फलकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, आप्पाजी पाटील, भूषण तम्माण्णाचे, निखिल पाटील, सागर पाटील, एम. आर. रणजित पाटीलसह अन्य मान्यवरांच्या हस्ते सहा गटातील स्पर्धांना झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

गटवार विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे, खुला गट मुले - दक्ष पाटील (स्टँडर्ड टॅक स्पोर्ट्स कंग्राळी खुर्द), सुरज भालेकर (भगतसिंग स्पोर्ट्स क्लब अॅकॅडमी हलकर्णी), रोहित भिकुर्डे (तेऊरवाडी), परशराम कुणगी, सदयाप्पा गोसावी (दोघेही तुमुरगु•ाr). मुली-स्नेहा हिरोजी, वैष्णवी कोवाडकर, सरिता पाटील, ऐश्वर्या कंग्राळकर. गावमर्यादीत (9 वी ते 12 वी)-सक्षम मरगाळे, श्रेयस पाटील, मदन अष्टेकर, विशाल सहाणी, रोहित धामणेकर. मुली-मथुरा जाधव व सायली पाटील. मुले (1 ली ते 8 वी)-सिद्धनगौडा पाटील, ओम चौगुले, समर्थ पाटील, विघ्नेश पाटील, मनोज लमाणी. मुली-समृद्धी दळवी, निशा पाटील, साक्षी पाटील, विद्या बेनके, वैष्णवी चौगुले. सहा गटातील विजेत्या स्पर्धकांना ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, मंगेश कांबळे, अमर निलजकर, एनआयएस कोच प्रशांत पाटील, जवान सोमनाथ पाटील, सदानंद निलजकर, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, भाऊ पाटील, अजित कदम, कल्लाप्पा पाटील, बाळाराम पाटील, चंद्रकांत मोरे, घळगु पावशे आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील, बसवंत पाटील, स्टँडर्ड टॅक स्पोर्ट्स, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मराठा साम्राज्य स्पोर्ट्स, भगतसिंग स्पोर्ट्स क्लबच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.