दक्ष निलजी, नानावाडी, जेएसपी बॉईज विजयी
साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत श्री इलेव्हन जेएसपी बॉईज, ब्रदर्स इलेव्हन, दक्ष स्पोर्ट्स निलजी, नानावाडी सुपरकिंग्ज संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली आहे. आदित्य वारंग, श्रीशैल जाधव, अभी पाटील, यश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित साईराज चषक क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दक्ष स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 109 धावा केल्या.
अभी पाटीलने 6 षटकार, 5 चौकारांसह नाबाद 76, प्रमोदने 24 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हंगरगा संघाने 8 षटकात 8 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात नामदेवने 4 षटकारासह नाबाद 31 तर दिनेशने 11 धावा केल्या. दक्षतर्फे संजय व अभयने प्रत्येकी 3 तर प्रमोदने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात नानावाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 71 धावा केल्या. त्यात यशने 3 षटकारासह 26, रोशनने 19 धावा केल्या. स्टारतर्फे यशने 2 गडी बाद केले. त्यांनतर स्टार इलेव्हनने 8 षटकात 4 गडी बाद 58 धावा केल्या. त्यात जाफरने 2 षटकारासह नाबाद 22 धावा केल्या. नानावाडीतर्फे सुजितने 2 तर विष्णूने 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात आदिशक्ती संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 52 धावा केल्या. त्यात संकल्पने 11 व अभीने 10 धावा केल्या. जेएसपी बॉईजतर्फे आदित्य वारंगने 9 धावात 5 तर विशालने 2 गडी बाद केले त्यांनतर जेएसपी बॉईजने 5.3 षटकात 4 गडी बाद 52 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. सचिनने 18 तर विनायकने 12 धावा केल्या. आदिशक्तीतर्फ रमेशने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात ब्रह्मलिंग स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात प्रविणने 2 षटकारासह 34 तर विनायकने 16 धावा केल्या. ब्रदर्सतर्फे निखीलने 2 तर विशालने 1 गडी बाद केला. त्यानंतर ब्रदर्सने 7.1 षटकात 5 गडी बाद 83 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात श्रीशैल जाधवने 2 षटकारासह 26 तर अथर्वने 2 षटकारासह नाबाद 23 धावा केल्या. ब्रह्मलिंगतर्फे वैभवने 3 गडी बाद केले.
स्टार खेळाडूंची आज झलक
मोहन मोरे संघात टेनिसबॉल क्रिकटमधील स्टार खेळाडू श्रेयश इंदुलकर, उमर खान, मुजमील, राहुल जोगोडिया व रोहित हे शुक्रवारच्या सामन्यात खेळणार आहेत.
आजचे सामने
► बालाजी स्पोर्टस हलगा वि. वामिका कॅम्प, स. 9 वा.
► मोहन मोरे स्पोर्ट्स वि. नानावाडी सुपरकिंग्ज, स. 11 वा.
► व्हीसीसी इलेव्हन वि. सिनियर गो इलेव्हन, दु. 1 वा.
► पहिल्या व दुसऱ्या सामन्यातील विजयी संघातील सामना, दु. 4 वा.