For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डकोटा जॉन्सनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

06:35 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
डकोटा जॉन्सनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
Advertisement

मर्लिन मुन्रोच्या व्यक्तिरेखेसाठी जोरदार तयारी

Advertisement

हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री डकोटा जॉन्सन सध्या एका आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. डकोटा ही हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री अन् गायिका राहिलेल्या मर्लिन मुन्रोच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. यातील डकोटाचा फर्स्ट लुक समोर आला असून तो पाहून तुम्ही मर्लिन अन् डकोटातील फरक ओळखू शकणार नाही.

फ्लॅश इम्पॅक्ट नाव असलेल्या बायोपिक शॉर्टफिल्ममधील फर्स्ट लुक अत्यंत लक्ष वेधून घेणारा आहे. यात डकोटा ही हुबेहुब मर्लिनप्रमाणे दिसत आहे. तिने एक कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन करत स्वत:चे रुप पूर्णपणे बदललले आहे. यातील तिच्या लुकची सध्या जोरदार प्रशंसा केली जात आहे.

Advertisement

फ्लॅश इम्पॅक्टचे दिग्दर्शन दिग्गज फिल्ममेकर मॅगी गिलेनहाल करत आहे. हा चित्रपट मुन्रो प्रसिद्ध होण्याचा काळ आणि ती वृद्धत्वापर्यंत जगली असती तर तिचे जीवन कसे असते या दोन्ही गोष्टी दाखविणार आहे. याचा प्रीमियर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.

मर्लिन ही हॉलिवूडमधील पहिली लेडी सुपरस्टार होती. 50 च्या दशकात मुन्रोने इंग्रजी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले होते. ती अभिनेत्री असण्यासोबत कमालीची गायिका होती. जेंटलमेन प्रेफर ब्लाँड्स आणि सम लाइक इट हॉट यासारख्या अनेक चित्रपटांसाठी तिची आठवण काढली जाते.

Advertisement
Tags :

.