डकोटा जॉन्सन गायकाच्या प्रेमात
क्रिस मार्टिनसोबत यापूर्वीच ब्रेकअप
फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे फेम अभिनेत्री डकोटा जॉन्सन स्वत:च्या खासगी आयुष्यावरून चर्चेत असते. सध्या ती अमेरिकन आर्टिस्ट रोल मॉडलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डकोटा जॉन्सन ही अलिकडेच रोल मॉडेल नावाने प्रसिद्ध टकर पिल्सबरीसोबत एका रोमँटिक डेट नाइटवर गेली होती. यावेळी डकोटाला त्याच्यासोबत स्पॉट करण्यात आले आणि याची छायाचित्रे आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.
रोल मॉडेल आणि डकोटा हे यावेळी उघडपणे प्रेम व्यक्त करत होते. डिसेंबरपासून डकोटा आणि रोल मॉडेल हे परस्परांना डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु या दोघांनी स्वत:चे नाते उघडपणे स्वीकारलेले नाही. डकोटा रोल मॉडेलसोबतच्या रिलेशनशिपकरता गंभीर असल्याचे तिच्या निकटवर्तीयांचे सांगणे आहे.
रोल मॉडेलपूर्वी डकाटा जॉन्सन ही कोल्डप्ले बँडचा मुख्य गायक क्रिस मार्टिनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी परस्परांना सुमारे 8 वर्षांपर्यंत डेट केले होते. परंतु जून 2025 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला होता. परंतु यामागील कारण समोर आले नव्हते.