For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डकोटा अन् अॅनी एकत्र

06:11 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
डकोटा अन् अॅनी एकत्र
Advertisement

अभिनेत्री डकोटा जॉन्सन आणि अॅनी हॅथवे यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘वेरिटी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त थ्रिलर आणि सस्पेंस असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दीर्घकाळापासून डकोटा आणि अॅनी यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव चर्चेचा विषय ठरला आहे. अलिकडेच निर्मात्यांनी याचा ट्रेलर प्रदर्शित केला असून यात डकोट अन् अॅनीसोबत अभिनेता जॉश हार्टनेटची झलक दिसून आली आहे. याची कहाणी एका स्ट्रगल करणारी लेखिका लोवेन ऐशलेच्या (डकोटा जॉन्सन) अवतीभवती घुटमळणारी आहे. लोवेन एका अपघात जखमी झाल्यावर दुसरी प्रसिद्ध लेखिका वेरिटी क्रॉफोर्डला (अॅनी हॅथवे) अर्धवट पुस्तकांना पूर्ण करण्याचे काम सोपविले जाते. परंतु ऐशले या कामासाठी वेरिटीच्या घरी जाते, तेव्हा तिला काही अशी पुस्तके हाती लागतात, ज्यात दडलेली रहस्यं आहेत.

Advertisement

वेरिटी क्रॉफोर्डने स्वत:च्या या पुस्तकांमध्ये स्वत:चा पती जेरेमी क्रॉमफोर्ड (जॉश हार्टनेट) आणि परिवाराच्या अन्य सदस्यांशी संबंधित भीतीदायक रहस्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्याविषयी कळल्यावर ऐशले हादरून जाते. वेरिटी हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन मायकल शोवाल्टरने केले आहे. यापूर्वी त्याने स्पॉइलर अलर्ट आणि द बिग शिक यासारखे चित्रपट दिलेले आहेत. वेरिटी हा चित्रपट अमेरिकेच्या प्रसिद्ध लेखिका कॉलीन हूवर यांच्याकडून लिखित लोकप्रिय कादंबरी ‘वेरिटी’वर आधारित आहे. ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झाली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.