For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

31डिसेंबर व 1जानेवारी रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना बंद

05:27 PM Dec 24, 2024 IST | Pooja Marathe
31डिसेंबर व 1जानेवारी रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना बंद
Dajipur Sanctuary closed to tourists on the arrival of the New Year
Advertisement

कोल्हापूर

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले राधानगरी तालुक्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य हे 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटक व अभ्यासक यांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी एस एस पवार (वन्यजीव) व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे.
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा व इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी महाराष्ट्रतुन हजारो पर्यटक हे अभयारण्य पहायला येत असतात. 31 डिसेंबर वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लॅस्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.