कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Dajipur Sanctuary: राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना, निसर्गप्रेमींना सहभागाचे आवाहन

12:29 PM May 04, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

यात सहभागी झाल्यावर निसर्गप्रेमींना थेट जंगलात वन्यप्राण्यांचे दर्शन घेता येते

Advertisement

By : महेश तिरवडे

Advertisement

कोल्हापूर (राधानगरी) : कोल्हापूर वन्यजीव विभागाने राधानगरी अभयारण्यात येत्या 12 आणि 13 मे 2025 रोजी बुध्द पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना आयोजित केली आहे. या उपक्रमात सहभागी होवू इच्छिणाऱ्या निसर्गप्रेमींकडून विभागाने अर्ज मागवले आहेत. राधानगरी अभयारण्यात एकूण 32 मचाणांवर ही गणना होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मे महिन्यातील बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात वन्यजीवांची ही महत्त्वपूर्ण गणना केली जाईल.

यात सहभागी झाल्यावर निसर्गप्रेमींना थेट जंगलात वन्यप्राण्यांचे दर्शन घेता येते. त्यांच्या आवाजांचा अनुभव घेता येतो. तसेच येथील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेची माहिती मिळते. या अनोख्या अनुभवामुळे वन्यजीव आणि वनविभागाच्या कार्याबद्दल जागरूकता वाढते. या प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करावा. पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे www.census2025@gmail.com या ईमेल आयडीवर 5 मे 2025 पर्यंत PDF स्वरूपात पाठवणे अनिवार्य आहे.

केवळ ईमेलद्वारे आलेले अर्जच स्वीकारले जातील, याची कृपया नोंद घ्यावी. मचाणांची संख्या मर्यादित असल्यामुळे जे उमेदवार आपले अर्ज लवकर पाठवतील, त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. या गणनेत सहभागासाठी अर्जदारांना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जाचे नामांकन निश्चित झाल्यावर शुल्क भरण्याची सूचना दिली जाईल. अर्ज भरण्यासंबंधी कोणत्याही शंका असल्यास विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#radhanagari#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaanimal censusDajipur sanctuaryForest Department
Next Article