दादा तुम्ही प्रशासनावर संतापला आम्ही कोणावर संतापायच...
दादा दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो, परंतु आमचे प्रश्न सोडवाः कोल्हापूरच्या प्रश्नाच काय झालंः उबाठा गटाचा दादानां सवाल
कोल्हापूर
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळस त्यांना प्रोटोकॉल नुसार गाडी न देता सुमार दर्जाची दिलेली गाडी पाहून रोखठोक स्वभावाच्यां दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावल व पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते यापार्श्वभुमीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी प्रसिधीस दिलेल्या पत्रकात अजितदादानां कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्ना बददल दादा तुम्ही प्रशासनावर संतापला आम्ही कोणावर संतापायच असा सवाल करत दादा दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो.परंतु आमचे प्रश्न सोडवा.असे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
स्वताःच्या व्यक्तिगत कामकाजाबरोबर सामाजिक कामाविषयी नेहमीच सतर्क असणारे दादा स्वतांच्या गाडीच्या सुविधांबद्दल सावधगिरी बाळगत असताना, आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आह.s याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूरच्या तोंडाला पाने पुसली असुन या राज्य शासनाने कोल्हापूरचे अनेक प्रलंबित प्रकल्पाबाबत लक्ष कधी देणार हा यक्षप्रश्न आज जनतेसमोर आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांनी घोषणा केलेल्या शंभर कोटीच्या रखडलेल्या रस्त्यासह तुंबलेले गटार, नदीत मिसळणारे नाले,लोकांचा श्वास घुसमटणारा झुम प्रकल्प, सुधारणेच्या प्रतिक्षेत असणारे शाहूजन्मस्थळ राजकीय श्रेयवादात रखडलेल्या अशा अनेक प्रश्नांवर कोल्हापूर आज लढत असताना आमच्या कर्तव्यदक्ष अजितदादांनी शिष्टाचाराला चांगली गाडी का नाही याविषयी प्रशासनला झापण्याऐवजी त्यांना कोल्हापूरच्या या प्रश्नाबाबत प्रशासनाला खडसावल असत तर अत्यंत योग्य झाल असत.असे ही या पत्रकात म्हटले आहे.
खरंतर आज कित्येक दिवसापासून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र,जोतीबा विकास आराखडा हा प्रलंबित पडलेला आहे त्याला कुठलाही प्रकारच्या निधीची व्यवस्था नाही. कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेक स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन करून सुध्दा राज्यशासनाने कुठलीहा हालचाल केलेली नाही. तथापि यासंदर्भामध्ये दादा योग्य ती खबरदारी घेऊन पुढच्या वेळेला येतांना दादांनी शिष्टाचाराच्या आलिशान वाहनाबरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा पत्रकात व्यवत करण्यात आली आहे.