डाबरला 506 कोटींचा नफा
06:01 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी डाबर इंडिया यांनी आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून कंपनीने नफ्यामध्ये 12 टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत नफा 506 कोटी रुपयांचा झाला आहे.
Advertisement
मागच्या वर्षी याच अवधीत 453 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. याच दरम्यान एकत्रित उत्पन्न 3563 कोटी रुपयांमध्ये कमविण्यामध्ये कंपनीने यश मिळविले आहे. मागच्या वर्षी 3191 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते. डाबरने भारतातील एफएमसीजी व्यवसायात वर्षाच्या आधारावर 10 टक्के वाढ नोंदविली आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये 20 टक्के वाढीव महसुल प्राप्त करणे कंपनीला शक्य झाले आहे.
Advertisement
Advertisement
