For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डाबर इंडियाचा नफा 8 टक्क्यांनी कमी

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
डाबर इंडियाचा नफा 8 टक्क्यांनी कमी
Advertisement

महसूल 2,830 कोटींवर : 5.25 लाभांश देण्याची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

तेल, टूथपेस्टपासून ते च्यवनप्राश आणि कफ सिरपपर्यंत अशा सर्व वस्तूंची निर्मिती करणाऱ्या डाबर इंडिया कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 8.2 टक्के इतकी घट नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 341 कोटी रुपये होता. कंपनीचा चौथ्या तिमाहीतील कामकाजातील महसूल वार्षिक आधारावर 0.53 टक्केने वाढून 2,830 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 2,815 कोटी रुपये होता. डाबर इंडियाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

Advertisement

5.25 रुपये लाभांश जाहीर

डाबर इंडियाने चौथ्या तिमाही निकालांसह त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 5.25 रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपन्या त्यांच्या नफ्यातील एक भाग त्यांच्या भागधारकांना देतात, ज्याला लाभांश म्हणतात.

कंपनीचा नफा अपेक्षेपेक्षा चांगला

आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत डाबर इंडियाचा नफा बाजारातील तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे, म्हणजेच कंपनीने यावेळी चांगली कामगिरी केली आहे.

समभाग  वर्षात 14 टक्क्यांनी घसरला

डाबर इंडियाचा समभाग 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 480 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 6 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षात 14 टक्के तर 6 महिन्यात 10 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 85.22 हजार कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :

.