डाबर इंडिया तामिळनाडूत 400 कोटी गुंतवणार
चेन्नई :
तामिळनाडू सरकारने राज्यातील विल्लुपुरम जिह्यात 400 कोटी रुपये खर्चून उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. राज्याचे उद्योगमंत्री टी.आर.बी. राजा यांनी करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, ‘डाबर इंडिया तमिळनाडूमध्ये आपले स्वागत आहे. त्यापेक्षा दक्षिण भारतात स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विल्लुपुरम जिह्यातील टिंडीवनम येथील सिपकॉट फूड पार्क येथे दक्षिण भारतातील पहिला जागतिक दर्जाचा उत्पादन कारखाना डाबरसोबत उभारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली,’ असल्याचेही ते म्हणाले आहेत.
कंपनी या सुविधेसाठी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे 250 हून अधिक नोकऱ्या निर्माण होतील, असे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या डेल्टा प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादने विकण्यासाठी नवी संधी आगामी काळात निर्माण होणार आहे, राजा म्हणाले.