प्रो कबड्डीचे जेतेपद दबंग दिल्लीकडे
06:30 AM Nov 02, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 31-28 ने पराभव करून प्रो कबड्डी लीगचे जेतेपद पटकावले आहे. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात दिल्ली दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या दीड मिनिटात पुण्याला मॅच फिरवण्याची संधी होती, पण दिल्लीच्या डिफेंडरनी आदित्य शिंदेला टॅकल करून ऐतिहासिक विजय मिळवला. याआधी दबंग दिल्लीने 2021-22 मध्ये पटना पायरेट्सचा पराभव करून पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती. तर पुणेरी पलटनने 2023-24 मध्ये हरियाणा स्टीलर्सचा फायनलमध्ये पराभव केला होता. या मोसमातल्या लीग स्टेजमध्ये दोन्ही टीम 13-13 मॅच जिंकण्यात यशस्वी ठरल्या होत्या, त्यामुळे दोन्ही टीमकडे 26-26 पॉईंट्स होते. अर्थात, शुक्रवारी झालेल्या फायनलमध्ये दोन्ही संघांनी सुरेख खेळ केला पण अखेरीस दिल्लीने बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली.
Advertisement
Advertisement
Next Article