For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी. वाय.पी इंजिनीअरिंग साळोखेनगर येथे 'सतेज मॅथ्स स्कॉलर' परिक्षा उत्साहात संपन्न

04:20 PM Dec 10, 2023 IST | Kalyani Amanagi
डी  वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर येथे  सतेज मॅथ्स स्कॉलर  परिक्षा उत्साहात संपन्न
Advertisement

कळंबा प्रतिनिधी

Advertisement

साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा,कागल,शाहुवाडी,गडहिंग्लज,आजरा,चंदगड, तसेच कोल्हापूर शहरातील बारावी विज्ञान शाखेतील 87 महविद्यालयांमधून 3026 विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.

संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी व पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा यासाठी हि परीक्षा घेतली जाते. रविवार १० डिसेंबर रोजी ही परीक्षा संपन्न झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याच्या सुविधे सोबत अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) क्रॅश कोर्स ला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. त्याचबरोबर बारावी बोर्ड व सीईटी (CET) व जेईई (JEE) परीक्षेसाठीसुद्धा उपयुक्त असेल.

Advertisement

परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर आयआयटी (IIT) च्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या. परीक्षेतील प्रश्नांमधील विविधता, परीक्षेची काठीण्यपातळी व परीक्षेचा आयोजनाबद्दल विध्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. नोंदणी न केलेल्या विध्यार्थ्यांना परीक्षेदिवशी महाविद्यालयामध्ये थेट नाव नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली. डी वाय पी ग्रुप चे विश्वस्त तेजस पाटील यांनी परिक्षास्थळी भेट शुभेच्छा दिल्या. तसेच यन्स कॉलेज प्रतिनिधींशी संवाद साधून उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. या उपक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने,प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. ऍडमिशन डीन प्रवीण देसाई, सर्व ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Advertisement
Tags :

.