For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी मार्टचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटींवर

06:56 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
डी मार्टचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटींवर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डी मार्ट ही रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून 330 स्टोअर्स देशभरातील विविध शहरात कार्यरत आहेत. अलीकडेच कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करु शकलं आहे.

मुंबईत डी-मार्ट स्टोअर उघडल्यानंतर, दमानी यांनी 2007 मध्ये अहमदाबादमध्ये एक स्टोअर उघडले. राधाकृष्ण दमानी यांच्या डी-मार्टने केवळ दोन स्टोअरसह 260 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर राधाकृष्ण दमानी  यांनी पुणे, बडोदा, सांगली आणि सोलापूर येथे डी मार्ट स्टोअर्स उघडली. 2010 पर्यंत, डी मार्टने भारताच्या पश्चिम भागात 25 स्टोअर्स उघडली होती.

Advertisement

यायोगे डी मार्ट तिसरी सर्वात मोठी रिटेल चेन बनली. सध्या डी मार्टची देशात 330 स्टोअर्स आहेत.

2013 मध्ये डी मार्टचा महसूल 3334 कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. डी मार्ट देशातील तिसरी सर्वात मोठी ब्रँडेड रिटेल चेन बनली आहे. याच्या पुढे रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुप होता. डी-मार्टची खास गोष्ट अशी आहे की त्यांनी खासगी स्तरावरील उत्पादने विकली नाहीत, तरीही 2014 मध्ये त्यांचा नफा 100 कोटी रुपयांच्या पुढे गेला होता.

डी मार्ट ब्रँडचा लक्षणीय विस्तार केला. यानंतर डी-मार्टचा महसूल 6450 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये 211 कोटी रुपयांच्या नफ्यासोबत डी मार्टने रिलायन्स रिटेल (159 कोटी रुपये) आणि फ्युचर रिटेल (153 कोटी रुपये) यांना या स्पर्धेत मागे टाकले आहे.

दमानी यांनी 21 मार्च 2017 रोजी डी-मार्टचा आयपीओ शेअरबाजारात आणला. ज्याद्वारे 1870 कोटी रुपये जमा झाले. हा आयपीओ 104 पट सबक्राइब झाला. शेअर बाजार बंद होईपर्यंत डी मार्ट 40,000 कोटी रुपयांची कंपनी बनली होती. आयपीओनंतरही, डी मार्टने टप्प्याटप्प्याने आपल्या कार्याचा विस्तार सुरू ठेवला.

एकही डी मार्ट स्टोअर बंद नाही

आजपर्यंत एकही डी मार्ट स्टोअर बंद केलेले नाही. 2021 मध्ये, डी मार्टची 234 स्टोअर्स होती, त्यापैकी 80 टक्के स्वत:ची शोरुम्स होती. आज डी-मार्टची देशभरात 330 स्टोअर्स आहेत आणि त्याचे मार्केट कॅप 2,00,000 कोटींच्या पुढे गेले आहे. डी मार्ट ही जगातील 603 वी मौल्यवान कंपनी आहे.

Advertisement
Tags :

.