डी-मार्टची नवी 10 स्टोअर्स सुरु
मुंबई :
देशातील सर्वात मोठ्या रिटेल डी-मार्टची देशात 10 नवी स्टोअर्स नुकतीच सुरु करण्यात आली आहेत. एव्हेन्यू सुपरमार्ट लिमीटेड यांच्या अध्यक्षतेखाली डी मार्टचे संचालन केले जाते. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगला महसूल प्राप्त केला आहे. शेअर बाजाराला माहिती देताना डी मार्टने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने एकंदर 10 नवी स्टोअर सुरु केली आहेत. या योगे डी-मार्टच्या एकूण स्टोअर्सची संख्या 442 वर पोहोचली आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील नवी मुंबईतील डी मार्ट स्टोअर बांधकामाच्या कारणास्तव बंद करण्यात आले असल्याचेही सांगितले आहे.
तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 17612 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याचे सांगितले जाते. मागच्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत महसूल 13 टक्के वाढीव दिसून आला. मागच्या वर्षी 15565 कोटींचा महसूल मिळवला होता.
दमानींचा वाटा
सर्वेसर्वा राधाकिसन दमानी हे असून त्यांनी डी मार्ट रिटेलचा प्रारंभ केला. डी मार्टची सहाय्यक कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट लिमीटेड ही आहे. दमानी यांची या कंपनीमध्ये 74.65 टक्के हिस्सेदारी आहे.