For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी. के.शिवकुमार आज मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार

06:55 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
डी  के शिवकुमार आज मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार
Advertisement

लोकसभवनमध्ये सायंकाळी 4:05 वाजता शपथविधी कार्यक्रम : 9 आमदार कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदी शक्य

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

राज्य काँग्रेसमध्ये अधिकार हस्तांतरणाचा प्रश्न सुटला असून माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे बुधवारी सायंकाळी 4:05 वाजता मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध होणार आहेत. बेंगळूरमधील राजभवन येथे शपथविधी कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. शिवकुमार यांच्यासोबत 9 कॅबिनेट दर्जाचे मंत्री शपथग्रहण करतील. सूत्रांनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात दहा सदस्यीय मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल. मात्र, शेवटच्या क्षणी ही संख्या 12 ते 15 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मागील मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या 8 जणांसोबत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र हे मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.

डॉ. जी. परमेश्वर, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगारे•ाr, कृष्णभैरेगौडा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, यु. टी. खादर, ईश्वर खंड्रे हे नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडने मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखविला आहे. ही यादी बुधवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध होणारे डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची निवड, प्रादेशिक आणि सामाजिक समतोल यासह विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांनी संभाव्य मंत्र्यांच्या यादीबाबत चर्चा केली. त्यामुळे बुधवारी सकाळी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणकोण सामील होणार, याविषयी मंगळवारी स्पष्ट माहिती उपलब्ध झाली नाही.

दरम्यान, बेंगळूरमध्ये लोकभवनमध्ये होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत हे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची आणि निवडक मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. शपथविधी समारंभानंतर शिवकुमार हे विधानसौधमध्ये उत्तर दरवाजातून प्रवेश करतील. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची शक्यता आहे.

सर्व धर्मातील धर्मगुरुंच्या उपस्थितीत शपथग्रहण

राज्याच्या इतिहासात प्रथमच, डी. के. शिवकुमार हे स्वामीजी, फादर आणि मौलवी यांच्यासह सर्व धर्मांच्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आतापर्यंत राज्यात सर्व धर्मांच्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचे उदाहरण नाही. त्यांनी याकरिता सर्व धर्म आणि जातींच्या सुमारे 55 स्वामींना आधीच आमंत्रित केले आहे. याच्या माध्यमातून ते सर्वधर्म सहिष्णुता, शांतता आणि सलोख्याचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

लोकभवनात प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवले जात असल्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा, शपथविधी सोहळ्यापूर्वी माहिती आणि प्रसारण विभागामार्फत प्रसारमाध्यमांना पास वितरित केले जातात. पण यावेळी, वितरण अद्याप सुरू झालेले नाही.

वार्ता खात्याला केवळ 50 पास वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी दहा पास दूरदर्शन चंदन वाहिनीला देण्यात आले आहेत. दहा पास वार्ता खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 20 पासपैकी प्रत्येक माध्यम संस्थेला एक पास दिला जाण्याची शक्यता आहे. खासगी छायाचित्रकारांना परवानगी नसल्याचे समजते.

कार्यक्रमासाठी कोणाकोणाला निमंत्रण?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, माजी मंत्री, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, पक्षाचे खासदार, सर्व धर्मगुरु, कनकपूर तालुक्यातील दो•आलहळ्ळी सरकारी शाळेतील विद्यार्थी, मजूर, पालिका कर्मचारी, शेतकरी नेते, दलित संघटनांचे नेते, मागासवर्गीय संघटनांचे नेते, स्त्राrशक्ती संघांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, चित्रपट, क्रीडा, न्यायव्यवस्था, साहित्य, कलाकार, उद्योजक, वाणिज्य उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, युवा नेते व इतरांना डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

विधानसौध, विकाससौधमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी

नव्या मुख्यमंत्र्यांचा बुधवारी सायंकाळी 4 वाजता शपथविधी कार्यक्रम लोकभवनमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळूरच्या विधानसौध आणि विकाससौधमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्यात आली आहे. विधासौध आणि आजुबाजूच्या परिसरात गर्दी व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने विधानसौधमधील कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याने यासंबंधीचा आदेश दिला आहे.

आज शपथबद्ध होणारे संभाव्य मंत्री

डॉ. जी. परमेश्वर

सतीश जारकीहोळी

प्रियांक खर्गे

रामलिंगारे•ाr

कृष्णभैरेगौडा

के. जे. जॉर्ज

एम. बी. पाटील

यु. टी. खादर

ईश्वर खंड्रे

Advertisement
Tags :

.