डी. के. हेरेकर ज्वेलर्सतर्फे महिला दिन उत्साहात
बेळगाव : खडेबाजार येथील डी. के. हेरेकर ज्वेलर्समध्ये जागतिक महिला दिनानिमित्त खास ऑफर्स सुरू करून महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत महिलांसाठी अनोखी आणि अविस्मरणीय खास ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. दुकानातील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहात आणखी भर पडली असून खास डिझाईन केलेल्या सुवर्ण आभूषणांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे. ज्वेलर्समधील सोन्याचे दागिने खरेदी केल्यास तेवढ्याच वजनाची चांदी विनामूल्य देण्यात येणार आहे. 10 हजार रु. किमतीचे चांदीचे दागिने खरेदी केल्यास विनामूल्य 0.100 मिलिग्राम सोन्याचे नाणे अगदी मोफत मिळविता येणार आहे. सदर ऑफर ही केवळ दागिन्यांवर वैध असून नाणे किंवा बिस्किटावर असणार नाही. ग्राहकांना याचा लाभ 30 मार्चपूर्वी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापर्यंत घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी 6360286261 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे डी. के. हेरेकर ज्वेलर्सवतीने कळविले आहे.