For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डी गुकेश नवा वर्ल्ड चॅम्पियन

06:10 AM Dec 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
डी गुकेश नवा वर्ल्ड चॅम्पियन
Advertisement

अंतिम सामन्यात दिला चीनच्या डिंग लिरेनला धक्का, सर्वांत तरुण विश्वविजेता बनून रचला इतिहास

Advertisement

वृत्तसंस्था/सिंगापूर

भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेशने गुऊवारी इतिहास रचताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा (फिडे) वर्ल्ड चॅम्पियनचा मुकुट पटकावला. चीनच्या डिंग लिरेनविऊद्धच्या ‘फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप’ लढतीच्या अंतिम सामन्यात 58 चालीत बाजी मारली आणि इतिहासातील सर्वांत तऊण विश्वविजेता बनण्याचा विक्रम त्याने नोंदवला. शेवटच्या सामन्यात दोन्ही खेळाडू उतरले तेव्हा 6.5-6.5 अशी बरोबरी झाली होती. गुकेशने सर्वांत जास्त गरज असताना आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात यश मिळवले. हा 18 वर्षीय खेळाडू डिंगवर ऐतिहासिक विजय मिळवून 18 वा बुद्धिबळ विश्वविजेता बनला. ‘फिडे’च्या अधिकृत वेबसाइटनुसार, गुकेश 7.5 आणि डिंग 6.5 अशी अंतिम गुणसंख्या राहिली.

Advertisement

‘फिडे’ने अधिकृत ‘एक्स हँडल’वरून घोषणा करताना म्हटले आहे की, गुकेश डी. हा इतिहासातील सर्वांत तऊण वर्ल्ड चॅम्पियन आहे. एप्रिलमध्ये या 18 वर्षीय भारतीयाने इतिहास रचताना ‘फिडे’ पॅंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती आणि लिरेनने मिळविलेल्या जागतिक विजेतेपदाचा तो सर्वांत तऊण आव्हानवीर बनला होता. या विजयानंतर गुकेश भावनाविवश झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गुकेशने हा विजय त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत लिरेनने सांगितले की, मी चूक केल्याचे लक्षात आल्यावर मला जोरदार धक्का बसला. तरीही मी खेळत राहीन. मला वाटते की, मी वर्षातील माझी सर्वोत्तम स्पर्धा खेळली आहे. कामगिरी अधिक चांगली होऊ शकली असती, पण बुधवारी ज्या प्रकारे वाचण्यात यशस्वी ठरलो त्याचा विचार करता हा योग्य निकाल आहे. शेवटी हरल्याचा मला कोणताही खेद नाही. डी. गुकेश आणि जगज्जेता लिरेन यांच्यातील 13 वा सामना बुधवारी अनिर्णित राहिला होता आणि या खेळाचा विजेता निश्चित करण्यासाठी आणखी एकच फेरी बाकी राहिली होती. एक क्लासिकल सामना तेवढा बाकी होता. या टप्प्यावर एक चूक फरक घडवून आणण्यास पुरेशी ठरली.

गुकेशने मोडला कास्पारोव्हचा विक्रम

रशियाचा महान खेळाडू गॅरी कास्पारोव्हने 1985 मध्ये अनातोली कार्पोव्हला हरवून वयाच्या 22 व्या वर्षी जेतेपद पटकावले होते. तेव्हा कास्पारोव्ह सर्वांत तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याचा विक्रम गुकेशने मोडीत काढला. या वर्षाच्या सुऊवातीला ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशने जागतिक मुकुटाचा सर्वांत तऊण आव्हानवीर बनून या लढतीत प्रवेश केला होता. चार तास चाललेल्या सामन्यात 58 चालींनंतर लिरेनविऊद्धचा विजय गुकेशने नोंदविला. जर गुऊवारचा सामनाही अनिर्णित राहिला असता, तर शुक्रवारी कमी कालावधीच्या टायब्रेकर सामन्यांतून विजेता निश्चित केला जाणार होता. पण गुकेशने ती वेळ येऊ दिली नाही. गुकेशने गुऊवारच्या निर्णायक सामन्यापूर्वी तिसऱ्या आणि अकराव्या फेरीत विजय मिळवला होता, तर 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीच्या आणि बाराव्या सामन्यात विजय मिळवला होता. इतर सर्व सामने अनिर्णीत राहिले होते. ‘पहिला गेम मी गमावला आणि सुदैवाने परत जाताना लिफ्टमध्ये विशी सर (विश्व़नाथन आनंद) भेटले. ते म्हणाले की, माझ्याकडे फक्त 11 सामने शिल्लक होते, तर तुझ्याकडे 13 शिल्लक आहेत’, असे गुकेशने विजयानंतर बोलताना सांगितले. आनंदने 2006 मधील व्हेसेलिन टोपालोव्हविऊद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्याच्या अनुषंगाने ते सांगितले होते. पहिला सामना गमावल्यानंतर अखेरीस ती लढत आनंदने जिंकली होती. विशेष म्हणजे आनंदनेही गुकेशप्रमाणे शेवटच्या क्लासिक सामन्यात (12 व्या) काळ्या सोंगाट्यांसह खेळताना विजय मिळविला होता. आनंदला 2013 मध्ये विश्वविजेतेपद गमवावे लागले होते. त्यावेळी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून तो पराभूत झाला होता.

लहानपणापासून पाहिलेले स्वप्न जगतोय : गुकेश

मी सध्या फक्त माझे स्वप्न जगत आहे, असे बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेशने गुऊवारी सांगितले. इतिहास रचणाऱ्या कामगिरीनंतर त्याचे निगर्वी व नम्र व्यक्तिमत्व जास्तच उठून दिसले. गेल्या 10 वर्षांपासून मी या क्षणाचे स्वप्न पाहत होतो. माझे हे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदित आहे, असे गुकेश त्याच्या अतुलनीय विजयानंतर म्हणाला. तो पुढे म्हणाला, मी थोडा भावूक झालो. कारण मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. पण नंतर मला दबाव टाकण्याची संधी मिळाली.  तो पुढे म्हणाला की, मी 6 किंवा 7 वर्षांचा असल्यापासून हे स्वप्न पाहत आलो होतो आणि हा क्षण सध्या जगत आहे. प्रत्येक बुद्धिबळपटूला हा क्षण जगायचा असतो. मी माझे स्वप्न जगत आहे. कँडिडेट्स स्पर्धा ते विजेतेपदापर्यंतच्या वाटचालीबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छितो, असे गुकेशने सांगितले. त्याने प्रतिस्पर्धी लिरेनचेही कौतुक केले. माझ्यासाठी डिंग हा खरा विश्वविजेता आहे. तो खऱ्या चॅम्पियनप्रमाणे लढला. मला डिंग आणि संघाबद्दल खेद वाटतो. मी माझ्या प्रतिस्पर्ध्याचे आभार मानू इच्छितो, असे गुकेश म्हणाला. आपल्या पालकांच्या योगदानाबद्दल बोलताना तो म्हणाला, माझ्यापेक्षा त्यांच्यासाठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याची स्वप्नपूर्ती मोठी आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा अर्थ असा नाही की, मी सर्वोत्तम खेळाडू आहे. अर्थात मॅग्नस कार्लसनच सर्वोत्तम आहे, असेही गुकेश यावेळी सांगण्यास विसरला नाही.

ऐतिहासिक विजय : पंतप्रधान मोदी

भारतभरात हा विजय साजरा झालेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘ऐतिहासिक’ संबोधले आहे. हा त्याची अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि अतुलनीय दृढनिश्चयाचा परिणाम आहे, असे मोदींनी ‘एक्स’वरील आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. एरव्ही संयमाने वागणारा गुकेश या विजयानंतर मोठ्या प्रमाणात हसला आणि आनंदाने त्याने आपले हात उंचावले. सहसा खेळताना त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसत नव्हते. त्या स्थितीपेक्षा पूर्णपणे भिन्न असे चित्र गुरुवारी दिसून आले. विश्लेषकांनी खरे तर लढत टायब्रेकरमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण आघाडी घेतल्यानंतरही गुकेशच्या चेहऱ्यावर कसलेही भाव दिसले नव्हते. ‘एंड गेम’ समपातळीवर असताना आणि बरोबरीकडे वाटचाल चालली असताना लिरेनची एकाग्रता क्षणिक भंगली आणि हे घडल्यामुळे संपूर्ण बुद्धिबळ जगाला धक्का बसला. अधिक जोर देत राहण्याच्या आणि दबाव टाकत राहण्याच्या क्षमतेने गुकेशचे पारडे जड बनविले आणि शेवटी चिनी खेळाडू कोलमडल्याने विजेतेपद भारतीय खेळाडूकडे चालून गेले.

Advertisement
Tags :

.