For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कानपूरमध्ये पुन्हा रेल्वेमार्गावर सिलिंडर

06:45 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कानपूरमध्ये पुन्हा रेल्वेमार्गावर सिलिंडर
Advertisement

57 दिवसांत 22 वी घटना : केंद्र सरकार बदलणार रेल्वे कायदा : देशद्रोहाचा खटला चालणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये प्रेमपूयर स्थानकानजीक जेटीटीएन मालगाडीला रुळावरून पालटविण्याचा कट रचण्यात आला होता. या कटानुसार रेल्वेमार्गावर छोटा सिलिंडर ठेवण्यात आला होता. रविवारी पहाटे 6 वाजता लूप लाइनवर  लोको पायलटने सिलिंडर पाहताच इमर्जन्सी ब्रेक लावून रेल्वेला सिलिंडरच्या 10 फूट अगोदर रोखल्याने अनर्थ टळला आहे.

Advertisement

देशात रेल्वेला पालविण्याचा हा 57 दिवसांमधील 22 वा प्र्रयत्न आहे. यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी सूरतमध्ये रेल्वेमार्गाला नुकसान पोहोचविण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. तर बिहारच्या मुजफ्फरपूर जंक्शनमध्ये शनिवारी रात्री मुजफ्फरपूर-पुणे विशेष रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले आहे. ही दुर्घटना रेल्वेला सिग्नल मिळालेला नसतानाही पुढे नेण्यात आल्याने घडली आहे.

रेल्वेला पालटविण्याचे कट पाहता केंद्र सरकार लवकरच रेल्वे कायद्यात दुरुस्ती करणार आहे. याविषयी लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. याच्या अंतर्गत दुर्घटनेचा कट रचल्यास देशद्रोहाचा गुन्हा नोंद होऊ शकणार आहे. तसेच जन्मठेपेच्या शिक्षेपासून मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असेल.

कानपूरमध्ये 14 दिवसांत दुसऱ्यांदा घातपाताचा प्रयत्न

कानपूरच्या प्रेमपूर स्थानकानजीक सिलिंडर रेल्वेमार्गावर मिळाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, आरपीएफ, जीआरपी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. मालगाडी कानपूर येथून प्रयागराजच्या दिशेने जात होती. रेल्वेमार्गावर 5 किलोचा सिलिंडर ठेवण्यात आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उत्तरप्रदेशात 38 दिवसांमध्ये रेल्वे पलटविण्याचा हा 5 वा कट आहे. यापूर्वी कानपूरमध्ये 8 सप्टेंबर रोजी भरलेला सिलिंडर ठेवून कालिंदी एक्स्प्रेसला पलटविण्याचा कट रचण्यात आला होता.

मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद

रेल्वे कायद्याच्या वर्तमान तरतुदींमध्ये रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 151 अंतर्गत रेल्वे दुर्घटनेचा कट सिद्ध झाल्यास कमाल 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. आता या अधिनियमात उपकलम जोडून त्याला देशद्रोहाच्या श्रेणीत आणण्याची तयारी आहे. रेल्वे मार्गांवर अडथळे निर्माण करणे दुर्घटनेचा कट आहे. यामुळे दुर्घटना झाल्यास आणि जीवितहानी झाल्यास आरोपीच्या विरोधात सामूहिक हत्येचा गुन्हा नोंद होऊ शकतो. याच्या अंतर्गत जन्मठेपेपासून मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. याविषयी कायदेशीर सल्लामसलत केली जात आहे. लवकरच  नव्या तरतुदी अधिसूचित होऊ शकतात.

संवेदनशील ठिकाणी कॅमेरे

रेल्वेमार्गावर सिलिंडर इत्यादी अवजड सामग्री ठेवण्याच्या कटाला हाताळण्यासाठी निवडक प्रवासीक रेल्वेंना संवेदनशील भागातून जाण्यापूर्वी पायलट लोको चालविली जाते. याचबरोबर रेल्वेमार्गावर पोलीस आणि गँगमॅनची पाहणी वाढविण्यात आली आहे. रेल्वे आगामी काळात संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसविणार आहे. रेल्वे इंजिनवरही कॅमेरे बसविण्याची योजना आहे, यामुळे रियल टाइम मॉनिटरिंग होऊ शकेल. अशास्थितीत रेल्वेमार्गावर घातक सामग्री ठेवलेली असल्यास चालक रेल्वे योग्यवेळी रोखू शकणार आहे.

Advertisement
Tags :

.