शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून पर्यटन व्यवसायिकांना सूचना
03:03 PM Oct 05, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण/ प्रतिनिधी
Advertisement
शक्ती चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील पर्यटक आणि मच्छीमारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासनाकडून आलेल्या सूचना यांची अंमलबजावणी करण्यासाठी मालवण पोलिसांनी आज किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायिकांची आणि मच्छीमारांची बैठक घेताना सूचना केल्या तसेच दोन नंबरचा खबरदारीचा बावटा लावण्यात आल्याने मच्छीमारीसाठी अगर पर्यटन व्यवसायिकांनी समुद्रात पर्यटकांना घेऊन जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहे. शिरोडा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असताना पोलिसांनी आज दिवसभर किनारपट्टीवर गस्त घालत सर्व पर्यटन व्यवसायिकांना सूचना केल्या आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article