महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिचौंग चक्रीवादळामुळे आंध्र, तामिळनाडूत दक्षता

06:19 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्या आंध्रप्रदेशला धडकणार : 144 रेल्वेगाड्या रद्द : तामिळनाडूत 100 एसडीआरएफ जवान तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

आंध्रप्रदेश आणि लगतच्या तामिळनाडू किनारपट्टीला मिचौंग चक्रीवादळ धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीच्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवस किनारपट्टी भागातून धावणाऱ्या जवळपास दीडशे रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब मार्गाच्या आहेत. तर तामिळनाडूमध्ये 100 एसडीआरएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून त्यांच्या बोटीही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत.

आंध्र किनारपट्टीला धडकणाऱ्या चक्रीवादळाला मिचौंग असे नाव देण्यात आले आहे. म्यानमारने हे नाव दिले असून ते मंगळवार, 5 डिसेंबर रोजी भारतीय किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. हे वादळ 5 डिसेंबरला सकाळी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकेल. त्यावेळी वादळाचा वेग ताशी 80-90 किमी असेल. हा वेग ताशी 100 किमीपर्यंत वाढूही शकतो. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 2 डिसेंबर रोजी खोल दाबामध्ये बदलले. येत्या 12 तासांत त्याचे वादळात रूपांतर होईल, असे सांगण्यात आले. 4 डिसेंबरच्या दुपारपर्यंत ते आंध्रप्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतर ते 5 डिसेंबरला आंध्रप्रदेशात धडकेल.

तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे रविवारी जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळ येण्यापूर्वी तामिळनाडूतील तिरूवल्लूर येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक फ्लोट्स, पाइपर बोट्स, बोट मोटर्स, लाईफ जॅकेटसह सज्ज आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या बोटी व्रेनच्या साहाय्याने हटवल्या जात आहेत. वादळामुळे कांचीपुरम जिल्ह्यात 100 हून अधिक एसडीआरएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

रेल्वेसेवा कोलमडणार

वादळामुळे मध्य रेल्वेने 3 ते 7 डिसेंबर दरम्यान धावणाऱ्या 144 गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, बेंगळूर, हैदराबाद, नवी दिल्ली, हावडा, लखनौ, विशाखापट्टणम, तिरूपती, पुद्दुचेरी आणि इतर मार्गांवर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये विजयवाडा जनशताब्दी (गाडी क्रमांक 12077 आणि 12078), निजामुद्दीन चेन्नई दुरांतो (गाडी क्रमांक 12269 आणि 12270), गया चेन्नई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12389 आणि 12390) आणि बरौनी-कोईम्बतूर यांचा समावेश आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवर वारे आणि पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोस्टल आंध्रप्रदेशात तुरळक, मुसळधार ते अतिवृष्टीसह मध्यम पावसाची शक्मयता आहे. आंध्रप्रदेशातील नागपट्टणम जिह्यातील वेलंकन्नी समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राच्या एमडी सुनंदा यांनी सांगितले. तसेच ओडिशाच्या किनारी भागात 4-5 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्मयता आहे. मिचौंग हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चौथे आणि हिंदी महासागरातील 2023 मधील सहावे वादळ आहे. या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशसह तामिळनाडू, ओडिशा आणि पाँडिचेरीमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article