For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा इन्फंट्रीतर्फे सायकल मोहीम

10:12 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मराठा इन्फंट्रीतर्फे सायकल मोहीम
Advertisement

बेळगाव, : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगावच्यावतीने किल्ले ते किल्ले सायकल मोहीम राबविण्यात आली. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडापासून या सायकल फेरीला सुरुवात झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात 550 कि.मी.ची ही सायकल मोहीम पूर्ण करण्यात आली. मेजर संदीप यांच्या नेतृत्वाखाली एकूण 7 किल्ल्यांना भेटी देण्यात आल्या. सिंहगडावरून आव्हानात्मक प्रवास करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांना भेटी देण्यात आल्या.

Advertisement

शाळकरी विद्यार्थ्यांशीही संवाद

वल्लभगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड तसेच बेळगावजवळील राजहंसगडाला भेट देण्यात आली. सैन्यातील जवानांना इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांशीही संवाद साधण्यात आला. सिंहगडावरील मोहिमेला सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु यांनी हिरवा झेंडा दाखविला. यामध्ये जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.