For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीतर्फे सभासदांसाठी ‘सायबर सिक्युरिटी’ कार्यक्रम

06:34 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य सोसायटीतर्फे सभासदांसाठी ‘सायबर सिक्युरिटी’ कार्यक्रम
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने बेळगाव विभागातील सोसायटीच्या सभासदांसाठी ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर विशेष जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयएमईआरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पुणे येथील राजेश पाठक यांनी सायबर गुन्हे कसे होतात, फसवणूक कशी होते आणि त्यावर आपण कसे नियंत्रण ठेवावे, त्याला बळी पडू नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

Advertisement

लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, सीईओ अभिजीत दीक्षित, विभागीय व्यवस्थापक राघवेंद्र नावल्ली यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. एस्र.आर. व्यवस्थापक सीमा देसाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व आभार मानले.

Advertisement
Tags :

.