For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर फसवणुकीच्या कारनाम्याचा पर्दाफाश

06:22 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायबर फसवणुकीच्या कारनाम्याचा पर्दाफाश
Advertisement

सीमकार्डचा मोठा साठा बिहारमध्ये जप्त : एटीएस, ईओयूचा तपास सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ गोपालगंज

बिहारमधील गोपालगंजमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी 8 हजार 774 सिमकार्ड आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इकॉनॉमिक ऑफेन्स युनिट (ईओयु) आणि बिहार एटीएस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सिमकार्डचा हा मोठा साठा लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार घडवण्याचा कट असू शकतो, अशी भीती पोलीस आणि तपास यंत्रणांना आहे.

Advertisement

5 एप्रिल रोजी गोपालगंजच्या कुचायकोट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश-बिहारच्या बलथरी चेक पोस्टवर एका कारमधून 8 हजार 774 सिमकार्ड आणि 18 हजार नेपाळी चलन जप्त केले होते. या सिमकार्डचा वापर सायबर फसवणुकीत होत असल्याचे अटक तऊणाने पोलीस चौकशीत सांगितले होते. पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून विमानाने हे सिमकार्ड गोरखपूर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर नेपाळहून आलेल्या पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील तीन तऊणांना विमानतळावरच हे सिमकार्ड मिळाले. हे संपूर्ण नेटवर्क काठमांडू, नेपाळ येथून कार्यरत असल्यामुळे यामागे शत्रू देश चीनचाही हात असण्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे.

अटक करण्यात आलेल्या तीन तऊणांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी असल्याचा दावा केला आहे. पण, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.  अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आता तपास यंत्रणांकडून जी काही मदत मागितली जाईल ती पुरविण्यास पोलीस दल सहकार्य करेल, असे गोपालगंजचे पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी सांगितले.

काठमांडू, नेपाळ येथील ‘सूत्रधार’ कोण?

काही सिमकार्ड अॅक्टिव्हेट तर काही साधी सिमकार्ड असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांना सापडलेल्या मोबाईलमध्ये लाखो ऊपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत. या टोळीशी संबंधित आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस कारवाईत व्यस्त आहेत. मात्र, यात किती लोक सहभागी आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. इतकी सिमकार्ड घेऊन कारनामे घडवण्याचा डाव कोणाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काठमांडू, नेपाळ येथून नेटवर्क चालवणारा सूत्रधार कोण?, याचा तपास केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि गोपालगंज पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags :

.