कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सायबर फ्रॉड ; दीड कोटी 'माला'जच्या स्वाधीन

05:00 PM Feb 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

वाई एमआयडीसीमध्ये मालाज कंपनीला 1 कोटी 53 लाख रुपयांचा गंडा अज्ञाताने युकेमधून घातला होता. त्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सायबर फसवणूक झालेली रक्कम वाई पोलिसांनी परत मिळवून दिली असून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मालाज कंपनीकडून आभार मानण्यात आले.

Advertisement

वाई एमआडीसीमध्ये मालाज कंपनी आहे. त्या कंपनीला सायबर फसवणूक करत अज्ञात व्यक्तीने युकेमधून 1 कोटी 53 लाख 52 हजार रुपये खात्यात वर्ग करून घेतले. त्यावरून अज्ञात व्यक्तीवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाई पोलिसांना सूचना केल्या. सायबर पोलीस ठाणे व वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर लंडनस्थित विदेशी बँकेला बीएनएसएस 94 प्रमाणे नोटीस देऊन सायबर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड करण्यास सांगितले. तसेच 1 कोटी 53 लाख रक्कम कंपनीला मिळवून दिली. या गुन्हयाचा तपास पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर, सायबर पोलीस पथक तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे परि. पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, कॉ वर्षा खोचे, सायबर कॅन्सल्टंट, जय गायकवाड, अॅड. रोहन सारडा यांच्या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article