For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्र्यांच्या नावे जाहिरातीद्वारे सायबर गुन्हेगारांचा वृद्धाला गंडा

12:16 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय मंत्र्यांच्या नावे जाहिरातीद्वारे सायबर गुन्हेगारांचा वृद्धाला गंडा
Advertisement

बेळगाव : केंद्रीय मंत्र्यांच्या नावे जाहिरातबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना फसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल झाला असून वंटमुरी कॉलनी येथील एका वृद्धाला गुन्हेगारांनी साडेसात लाख रुपयांना ठकविले आहे. 76 वर्षीय प्रकाश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदर्श आनंद राहणार कोल्हापूर, दामोदर, राहणार बुलढाणा या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने एक जाहिरात तयार करून शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवा, असे आवाहन करण्यात आले होते.

Advertisement

या जाहिरातीच्या खाली असलेल्या लिंकवर वृद्धाने क्लिक करून आपले नाव नोंदविले. आदर्श आनंद नामक एका भामट्याने वृद्धाशी संपर्क साधून फोन पे च्या माध्यमातून 16,500 रुपये भरण्यासाठी सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून रक्कम भरल्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला कसलाच नफा मिळाला नाही. आणखी गुंतवणूक करा, असे सांगण्यात आले. त्या वृद्धाने टप्प्याटप्प्याने 7 लाख 39 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून जमा केले. तरीही त्या वृद्धाला नफा तर नाहीच गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत. 11 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.