कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Cyber Crime News: सायबर भामट्यांचा भाविकांना गंडा, फसवणूक का होते, काळजी कशी घ्याल?

02:13 PM Jul 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंबाबाईच्या भाविकांनाही अशा सायबर भामट्यापासून सुरक्षा देण्याची गरज 

Advertisement

By : संतोष पाटील

Advertisement

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवरून भाविकांची फसवणूक होत आहे, हा प्रकार प्रशासनाच्या नजरेस आला. यापूर्वी देशातील मोठ्या देवस्थानच्या वेबसाईटवरही असे प्रकार घडले, त्या देवस्थानांनी यावर योग्य उपाययोजना केल्या. आता अंबाबाईच्या भाविकांनाही अशा सायबर भामट्यापासून सुरक्षा देण्याची गरज आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवरील नको असलेला मजकूर हटवताना मंदिर प्रशासनाला काही फेक वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक सुरू असल्याचे उघडकीस आले. यापूर्वी असा प्रकार देशभरातील सर्वच मोठ्या देवस्थानच्या वेबसाईटच्या माध्यमातून झाला आहे.

त्या-त्या देवस्थानांनी योग्य ती काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. त्याच धर्तीवर अंबाबाईच्या भाविकांनाही या सायबर भामट्यापासून सुरक्षा देण्यासाठी पावले उचलली जाण्याची गरज आहे.

देशातील सर्वच लहान मोठ्या धार्मिक संस्था, मंदिरे, ट्रस्ट आणि देवस्थाने तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगभरात पोहोचली. याच डिजिटल व्यासपीठांवर सायबर सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे श्रद्धा आणि व्यवहार धोक्यात आल्याचे अंबाबाई मंदिराच्या वेबसाईटवरील पडताळणीत समोर आले.

सायबर सुरक्षा ऑडीट

"हायपरटेक्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर (एचटीटीपीएस) संकेतस्थळ आणि वापरकर्त्यांमधील माहिती ‘एक्रिप्ट’ करते. अनेक धार्मिक वेबसाईट्स एचटीटीपीवर चालतात, ज्यामुळे माहिती चोरीचा धोका असतो. सिक्युरिटी सर्टिफिकेटमुळे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित राहते. हे प्रमाणपत्र नसल्यास ब्राऊजर वापरकर्त्याला नॉट सिक्युअर, इशारा देतो. सहा महिन्याला देवस्थानने सायबर सुरक्षा ऑडिट रिपोर्ट देणे बंधनकारक करावे. त्रुटीची पडताळणी करावी."

- संदीप पाटील, लंडनस्थित, सायबर अभ्यासक

भाविकांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेऊ

"काही चुकीच्या अॅप्सवरुन भाविकांना अभिषेक तसेच चुकीच्या पध्दतीने पैसे घेतल्याचे समार आले आहे. याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत पोलीस चौकशी केली जाईल. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल. भाविकांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल."

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

उपाययोजना

आयटी, सायबर सल्लागार समिती प्रत्येक देवस्थान संस्थेकडे असावी.

वेबसाईट, अॅपमध्ये बदल केल्यानंतर लॉग रजिस्टर’ राखला जावा.

प्रत्येक 3 महिन्यांनी सुरक्षा अपडेट्स, बग फिक्सेस आणि तपासणी केली जावी.

शनि शिंगणापूर

दर्शनासाठी ‘व्हीआयपी दर्शन’, ‘पुजा बुकिंग’ नावाने फेक वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सव्दारे शनि दोष निवारण पूजा घरबसल्या करण्याचे सांगत ऑनलाईन पेमेंट घेण्यात आले. महाराष्ट्र सायबर र्पालिसांनी 2021 आणि 2023 मध्ये अशा चार वेबसाईट्स आणि दोन अॅप्सवर कारवाई केली होती. त्यानंतर ट्रस्टने कोणतीही पूजा, अभिषेक किंवा चढावा ऑनलाईन घेतला जात नसल्याचे जाहीर केले. सायबर गुन्हेगारीच्या केसेस दाखल करून सायबर क्राईम युनिटच्या मदतीने तपास केला.

साईबाबा संस्थान

शिर्डी व्हीआयपी दर्शन डॉट कॉम, ऑनलाईन साईबाबा डोनेशन ओआरजी, अशा नावाने बनवलेल्या बनावट वेबसाईट्सद्वारे भाविकांकडून देणग्या गोळा केल्या. ‘गोडसेवा’, ‘आरतीचे आरक्षण’ यासाठी पैसे मागितले. यातून कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर फक्त अधिकृत संकेतस्थळ (साई डॉट ओआरजी डॉट इन) आणि ट्रस्ट कार्यालयात सेवा, देणगी स्वीकारावी, असे स्पष्ट करत बँक खाते तपशील शेअर करण्यास ट्रस्टने मनाई केली.

तिरुपती बालाजी

व्हीआयपी दर्शन, ब्रेक दर्शन पास, ऑनलाईन अर्चना या नावाने बनावट वेबसाईट्सवरून कोट्यावधींच्या देणग्या गोळा केला. 2022 मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) शंभरांहून अधिक फेक वेबसाईट्स आणि सोशल मीडिया पेजेसवर कारवाई केली.

वैष्णोदेवी

कोरोनानंतरच्या काळात ‘घरबसल्या दर्शन आणि पूजा सेवा’ याखाली बनावट वेबसाईट्सवरून ऑनलाईन देणग्या गोळा केल्या. सोशल मीडियावर अधिकृत देणगीदार म्हणून युपीआयद्धारे नंबर शेअर केले होते. काही युजर्सनी आपली बँक माहिती शेअर केल्यामुळे सायबर फ्रॉडसुद्धा झाला.

काशी (वाराणसी)

काशीविश्वनाथ डॉट ऑर्ग डॉट इन सारखी फेक वेबसाईट तयार करून मोबाईल अॅप्सद्वारे ‘मोक्षपूजा’, ‘पिंडदान’ सेवा देतो, असे भासवले. बनावट पावत्या देऊन विदेशी भाविकांकडून डॉलरमध्ये पेमेंट स्वीकारले. उत्तर प्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत चार आरोपींना अटक केली.

भाविकांनी 'ही' काळजी घ्यावी..

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#Aambabitempal#Cyber Crime#CyberCell#jotibamandir#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAmol YedgeCyber Crime Newsshinganapurwebsite
Next Article