मळगाव घाटीतील धोकादायक झाडे तोडण्यास सुरुवात
02:38 PM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांचा पाठपुरावा
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
मळगाव घाटीतील धोकादायक झाडे तसेच भर रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यास गुरुवारपासून वनखात्याने सुरुवात केल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत माजगाव पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांनी वनखात्याचे लक्ष वेधून धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याची मागणी केली होती.मळगाव घाटीत रस्त्याच्या दुतर्फ अनेक धोकादायक झाडे कोसळण्याच्या स्थितीत होती. तसेच झाडांच्या फांद्याही भर रस्त्यावर आल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवितास ही धोकादायक ठरणारी ही झाडे तोडण्यासाठी माजगाव पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांचा नेतृत्वाखाली वेत्ये, मळगाव, माजगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांचे लक्ष वेधले होते.
Advertisement
Advertisement