For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदर्शनाच्या तोंडावर ‘सिंकदर’ चित्रपटातील दृष्यांना कात्री ?

05:35 PM Mar 26, 2025 IST | Pooja Marathe
प्रदर्शनाच्या तोंडावर ‘सिंकदर’ चित्रपटातील दृष्यांना कात्री
Advertisement

मुंबई

Advertisement

ईदनिमित्त भाईजान सलमान खान नेहमीच चाहत्यांना एका नव्या सिनेमाची भेट देतो. आता ईदला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भाईजानचे चाहते 'सिकंदर' सिनेमाकडे डोळे लावून बसले आहेत. चाहत्यांना कधी एकदा थिएटरमध्ये जाऊन सिंकदर बघतोय असे झाले आहे.

सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट येत्या (३० मार्च) ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ईदनिमित्ताने सिकंदरच्या माध्यमातून भाईजान पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी येत आहे. ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, निर्मात्यांनी चित्रपटामध्ये एक मोठा बदल केला आहे.

Advertisement

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून UA 13+ असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘सिकंदर’ चित्रपटातील १४ मिनिटे आणि २८ सेकंदांचे फुटेज कट केले आहे.

निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता ‘सिकंदर’ या सिनेमाचा रनटाइम २ तास १५ मिनिटे आणि ४७ सेकंद इतका झाला आहे.  याआधी सिंकदर चित्रपट हा २ तास ३० मिनिटे इतक्या लांबीचा होता. मात्र आता निर्मात्यांनी लावलेल्या चित्रपटातील काही सीनला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निर्णयामुळे सिनेमात काही ठिकाणी संवादांमध्ये थोडा फार बदलही जाणवू शकतात, तसेच साधारण २६ दृश्यांवर मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ‘सिकंदर’चे अनेक छोटे सीनही कापण्यात आले आहेत. “आते रहेंगे अब तो” अशी ओळ असलेला ५६ सेकंदांचा सीनच काढून टाकण्यात आला आहे. सिनेमातील होळी साजरा करण्याचा एक सीन ४० सेकंदांनी कमी करण्यात आला आहे. चित्रपटाचा वेग वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

Advertisement
Tags :

.