For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्यूट बम्पी : निळ्या डोळ्यांचा गुलाबी मासा

07:00 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्यूट बम्पी   निळ्या डोळ्यांचा गुलाबी मासा
Advertisement

कधीकधी खोल महासागरात असे जीव आढळतात, जे भीतीदायक असतात, परंतु काही इतके गेंडस असतात की अॅनिमल क्रॉसिंग गेममध्ये त्यांना स्थान मिळेल. कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून 2368 ते 4119 मीटर खोलवर तीन नव्या स्नेलफिश प्रजाती मिळाल्या आहेत. यात सर्वात क्यूट बम्पी स्नेलफिश असून तो गुलाबी रंगाचा टेडपोलसारखा, गुगली डोळ्यांनी युक्त आहे. स्नेलफिश (फॅमिली लिपारिडे) नाव उथळ समुद्रात हा खडक किंवा सागरी शेवाळात चिकटण्यासाठी पोटावर चूसक डिस्कचा वापर करत असल्याने मिळाले आहे. खोलवर हा डिस्कद्वारे स्वत:ला रोखून ठेवतो. जगभरातील महासागरांमध्ये 400 हून अधिक स्नेलफिश प्रजाती आहेत, परंतु खोलवर (अबिसल झोन) अत्यंत कमी दिसून आले आहेत. हे जेली सारखे शरीर आणि पातळ शेपूट असलेले असतात.

Advertisement

तीन नव्या प्रजाती

या तिन्ही नव्या प्रजाती कॅलिफोर्नियाच्या मोन्टेरे बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी शोधल्या आहेत. या प्रजाती स्टेशन एम (कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून 130 मैल अंतरावर) आणि मोन्टेरे कॅनियनमधून मिळाल्या. इच्थियोलॉजी अँड हेरपेटोलॉजी नियतकालिकात त्यांच्याविषयीचा तपशील प्रकाशित झाला आहे.

Advertisement

बम्पी स्नेलफिश : सर्वात आकर्षक, गुलाबी रंग, गोल डोकं, मोठे निळे डोळे, शरीरावर गाठी (बम्प्स), नाव कोल्लिकुली असून लॅटिनमधील याचा अर्थ छोटे पर्वत असा होतो, लांबी 2-3 इंच आहे. सीटी स्कॅनद्वारे याच्या हाडं अन् अंतर्गत संरचनेचा खुलासा झाला आहे. ही खोलवर दबावत जिवंत राहण्यासाठी प्रोटीनने निर्मित प्रजाती आहे.

डार्क स्नेलफिश : काळा रंग, गोल डोकं, क्षैतिज मुख, एक नॉस्ट्रिल आणि 6 बांचियोस्टेगल रेज, 4119 मीटर खोलवर आढळून आला, नाव वैज्ञानिक यान्सी यांच्या सन्मानार्थ मिळाले.

स्लीक स्नेलफिश : लांब, काळे, स्लीक बॉडी, स्टेशन एमचे नाव ‘ईएम’द्वारे प्रेरित. हे सर्व अबिसलझोन (महासागराचा तळाचा हिस्सा)मधील आहेत. जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. दबाव पृष्ठभागापेक्षा 1000 पट अधिक आहे. यांचे जेली शरीर दबाव सहन करू शकते. मोठे डोळे काळोखात मदत करतात. रंग लपविण्याची क्षमता मिळवून देतो.

Advertisement
Tags :

.