बीएससी मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पावधीतच वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रामध्ये लोकप्रिय झालेली बीएससी टेक्स्टाईल मॉल सध्या गर्दी खेचत आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी येथे ग्राहकांची झुंबड उडाली आहे. केवळ बेळगाव आणि कर्नाटकमधीलच नव्हे तर महाराष्ट्र आणि गोवा येथून ग्राहक गर्दी करत आहेत. मुख्य म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाला जसे हवे तसे पोशाख येथे उपलब्ध आहेत. याशिवाय दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सवलतीही देण्यात येत आहेत.
या पाच मजली वस्त्रदालनामध्ये महिलांसाठी, मुलांसाठी, पुरुषांसाठी वेगवेगळी दालने आहेत. त्यामुळे निवांतपणे खरेदी करणे शक्य आहे. पसंतीसाठी विविध नमुने आणि परवडणारे दर यामुळे ग्राहक समाधानाने खरेदी करून जात आहेत. त्याचबरोबर इमिटेशन ज्वेलरी, घड्याळे, सौंदर्य प्रसाधने, पादत्राणे, पर्फ्युम्स, हँडबॅग्स, क्लचिस व लगेज वेयर यांचेही दालन येथे आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू देण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. दिवाळीचा मुहुर्त साधा आणि बीएससीमध्ये खरेदी करा, असे आवाहन या टेक्स्टाईल मॉलने केले आहे.