For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाराजीनाट्यावर अखेर पडदा

06:45 AM Jun 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाराजीनाट्यावर अखेर पडदा
Advertisement

मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी घेतला राजीनामा घेतला मागे : समजूत काढण्यात मुख्यमंत्री शिवकुमार, सुरजेवाला यांना यश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

पाटबंधारे खाते देण्यात आल्याने नाराज झालेल्या रामलिंगा रे•ाr यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. खातेवाटपावरून इतर मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केल्याने काँग्रेस सरकारमध्ये मतभेद पुन्हा उफाळून आला होता. अखेर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा मागे घेतला. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची रचना होताच खातेवाटपावरून मंत्री रामलिंगा रे•ाr, के. एच. मुनियप्पा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. रामलिंगा रेड्डी यांनी तर राजीनामा देत पाटबंधारे खाते नाकारले. बेंगळूर शहर विकास खाते दिले तरच मंत्रिमंडळात सहभागी होईल, अशी ठाम भूमिका घेतल्याने राज्य सरकारमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हा गोंधळ दूर झाला आहे.

शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन रामलिंगा रेड्डी  राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते मोबाईल स्वीच ऑफ करून अज्ञात स्थळी गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सूचनेवरून त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेकांनी रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर रात्री उशिरा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. उभयतांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी शिवकुमार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

अखेर शनिवारी सकाळी वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांना रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. यावेळी सुरजेवालांनी रामलिंग रेड्डी ना काँग्रेस हायकमांडचा निर्णय कळवला. सुरजेवाला यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामलिंगा रेड्डी म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला जाणार नसल्याचे  मला कळविले. जर मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नसेल तर याचा अर्थ तो फेटाळला गेला आहे. मी मुख्यमंत्र्यांशी आधीच विस्तृत चर्चा केली आहे. आमच्या सध्या कोणताही गोंधळ नाही. खातेवाटप किंवा खातेबदलाबाबत योग्य निर्णय मुख्यमंत्री व पक्षाचे नेते घेतील, असे सांगितले. रामलिंगारेड्डी यांच्या या स्पष्टीकरणामुळे पाटबंधारे खाते आणि सरकार स्तरावर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

अतिरिक्त खाते देणार?

शनिवारी सकाळी सुरजेवाला यांनी रामलिंगा रेड्डी यांच्याशी दीड तास चर्चा केली. त्यांचे मनपरिवर्तन करण्यात सुरजेवाला यशस्वी ठरले असले तरी त्यासाठी कोणते आश्वासन द्यावे लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामलिंगा रेड्डी यांना पाटबंधारे खाते देण्यात आले असून आता अतिरिक्त लघुपाटबंधारे खातेही देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

चुकीच्या समजुतीमुळे हे घडले!

रामलिंगा रेड्डी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. खातेवाटपाच्या मुद्द्यावर ते नाराज होते.  चुकीच्या समजुतीमुळे असे घडले आहे. किरकोळ नाराजीचा मुद्दा भाजपने राजकीय स्वार्थासाठी वापरला. रामलिंगा रे•ाr हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद आणि सिद्धरामय्या यांच्याशी देखील मी चर्चा केली आहे.

- रणदीप सुरजेवाला, राज्य काँग्रेस प्रभारी

Advertisement
Tags :

.