शापित राजकुमार
क्रिकेटमध्ये आकडेवारी हा खेळाडूंचा आरसा असतो. काही वर्षांपूर्वी विंडीजचा संघ भारतात आला होता. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर दैनिक तऊण भारत (बेळगाव) साठी विंडीज दौऱ्यांचे वार्तांकन आणि स्तंभलेखन करत होते. त्यावेळी मी त्यांच्याशी क्रिकेटमधील आकडेवारीबद्दल उहापोह केला होता. निमित्त होतं वानखेडे स्टेडियम वरील विंडीज विऊद्धच्या सचिन तेंडुलकरच्या 101 व्या कसोटी सामन्याचं. आकाशवाणीच्या समालोचन कक्षात त्यावेळी करमरकर सर म्हणाले होते कि, तुम्ही सामन्यात किती सक्षम आहात त्याचं उत्तर तुमची आकडेवारी देते.
सध्या रोहित शर्मा त्याच संक्रमणातून जातोय. ‘इएसपीएन’चे पत्रकार सिद्धार्थ मोंगा यांनी आपल्या एका लेखात ‘नाग्या’या एका व्यक्तिरेखेचे वर्णन केले आहे. बोरिवलीमध्ये ‘नाग्या’ नावाचं जनरल स्टोअर होतं. त्या दुकानाच्या पीसीओमध्ये एक पोरगा नेहमीच दिसायचा. त्याचा आणि त्यांच्या मित्राचा कट्टा हाच होता. त्यावरून त्यांच्या मित्राने त्याला ‘नाग्या’ हे टोपण नाव दिले. हा ‘नाग्या’ दुसरा तिसरा कोण नसून ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे ‘नाग्या’ कसा बदलला हे त्यांनी त्या लेखात सांगितले. 2011 मध्ये ज्यावेळी एम. एस. धोनीने वानखेडे वरती ज्यावेळी वर्ल्डकप उंचावला होता त्यावेळी रोहित शर्मा त्या संघात नव्हता. त्याचवेळी कदाचित रोहित शर्माने मनाशी गाठ बांधली होती की भविष्यात मीही आयसीसीच्या ट्रॉफ्या उंचावेन. तशी संधी त्याला मिळाली नव्हती का तर असे मुळीच नाही. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जर कदाचित पराभव झाला नसता तर एक कप त्याच्या नावावर निश्चित लागला असता. 2023 मध्ये विजयाचा रतीब टाकून अंतिम सामन्यात विजयापासून दूरच राहावं लागलं. त्यानंतर काही दिवसातच टी-20 वर्ल्ड कप वर मात्र त्यांनी नाव कोरलं. आणि आता वेळ आहे ती चॅम्पियनस ट्रॉफीची. आता प्रश्न असा निर्माण होतोय की रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीची उंची गाठेल का? मुळात रोहित शर्मा तयार झाला तो धोनीच्या छत्रछायेखालीच. झटपट क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला तो धोनीनेच. त्या संधीचे त्याने सोने ऐवजी प्लॅटेनिअम (सोन्यापेक्षा जास्त महागडा धातू) केला असे मी म्हणेन.
रोहितच्या कॅप्टन्सीचा विचार केला तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रिकी पॉंटिंग बाजूला झाल्यानंतर रोहित शर्माची वर्णी लागली. मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना पाचवेळा त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर सलग दोनवेळा आयसीसी इव्हेंटच्या नॉकआऊट स्टेजमध्ये पराभवाचे तोंड बघावं लागलं होतं. तीच गोष्ट 2023 च्या वर्ल्डकपची. त्याच्या कर्णधार पदामध्ये खोट होती कां? तर मुळीच नाही. ज्या-ज्या वेळी त्याने गोलंदाजांवर विश्वास दाखवला त्या-त्या वेळी गोलंदाजाने आपले काम फत्ते केले. 2023 वर्ल्डकपवर आपण नजर टाकली तर आश्विन आणि चहल असताना त्याने कुलदीप यादववर जास्त विश्वास दाखवला. आणि तो विश्वास त्याने सार्थही केला. गोलंदाजीत अचूक बदल कसे करावेत ते रोहितकडूनच धडे घ्यावेत. पाटा विकेटवर विश्वचषक स्पर्धेत प्रथम ऑस्ट्रेलिया नंतर पाकिस्तान, न्यूझीलँड आणि इंग्लंड या सर्व दिग्गज संघाचे सर्वच्या सर्व गडी बाद केले. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये त्याच्या कप्तानपदाला त्याच्या बॅटने मात्र कुठलंही टेन्शन येऊ दिलं नाही. ऑस्ट्रेलिया विऊद्ध शून्यावर बाद झाल्यानंतरसुद्धा त्याची फलंदाजी बहरली होती. एवढं सर्व असूनसुद्धा मला राहून राहून हाच प्रश्न पडतोय की रोहित शर्मा क्रिकेटमधील शापित राजकुमार आहे कां? डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मी दोन शापित राजकुमार बघितले. सर्वप्रथम स्वर्गीय पद्माकर शिवलकर. ज्यांनी कित्येक गडी बाद करूनसुद्धा क्रिकेटमधील खरं सौंदर्य (कसोटी क्रिकेट) त्यांना न्याहाळता आलं नाही. तर दुसरीकडे अमोल मुजुमदार. मुंबई रणजी संघाचा प्रतिभावंत फलंदाज. ज्याच्याकडे क्रिकेटचे सर्व ट्रेडमार्क फटके होते.
सदर ट्रॉफी जर रोहित शर्माने जिंकली तर मात्र चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपात रोहित शर्माला उ:शाप मिळेल एवढं मात्र खरं. लॉन टेनिसमध्ये बोरीस बेकर ने ग्रँडस्लॅम स्पर्धेत बरेच वर्ष अव्वल मानांकन राखलं होतं. अव्वल मानांकन राखणं रोहितच्या वयोमर्यादेनुसार सध्या तरी कठीण आहे. ही ट्रॉफी जिंकून रोहितने द्वितीय मानांकन राखावं हीच अपेक्षा. शेवटी काही गोष्टी या आपल्या हातात नसतात हेच खरं. तरीसुद्धा तो कसोटी क्रिकेटपासून कोसो मैल दूर राहिला. यांच्यासाठी कधी बेदी, प्रसन्ना, द्रविड आडवे आले. तीच गोष्ट रोहित शर्माची. जागतिक क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी असा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसी इव्हेंटच्या सर्व ट्रॉफी जिंकल्यात. त्याची बरोबरी करण्याची नामी संधी नियतीने त्याला दिली होती. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा विचार केला तर रोहितही ‘शापित राजकुमार’ निघाला. सर्व काही असूनसुद्धा त्याला वर्ल्डकप जिंकता आला नाही. जर कदाचित तो जिंकला असता तर आज त्याला महेंद्रसिंग धोनीची बरोबरी करण्याची संधी होती. आता मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची नामी संधी त्याच्या समोर चालून आली आहे. सदर ट्रॉफी जर रोहित शर्माने जिंकली तर मात्र चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपात रोहित शर्माला उ:शाप मिळेल एवढं मात्र खरं. लॉन टेनिसमध्ये बोरीस बेकर ने ग्रँडस्लॅम स्पर्धेत बरेच वर्ष अव्वल मानांकन राखलं होतं. अव्वल मानांकन राखणं रोहितच्या वयोमर्यादेनुसार सध्या तरी कठीण आहे. ही ट्रॉफी जिंकून रोहितने द्वितीय मानांकन राखावं हीच अपेक्षा. शेवटी काही गोष्टी या आपल्या हातात नसतात हेच खरं.