महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सध्याच्या जिम्नॅस्टमध्ये ती ओढ नाही : दीपा कर्माकर

06:40 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नुकतीच निवृत्त झालेली भारतीय जिम्नॅस्टिक स्टार दीपा कर्माकर हिने सध्याच्या पिढीतील बहुतेक जिम्नॅस्टमध्ये उत्कटतेचा अभाव आहे आणि त्यांनी जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी या खेळाचा उत्साहाने स्वीकार करावा, असे मत व्यक्त केले आहे.

Advertisement

ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट बनून 2016 च्या रिओ गेम्समध्ये ऐतिहासिक चौथा क्रमांक पटकावणारी दीपा या महिन्याच्या सुऊवातीला निवृत्त झाली. अत्यंत कठीण प्रोडुनोव्हा व्हॉल्ट नियमितपणे करण्यात तिचा हातखंडा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला जिम्नॅस्टमध्ये एखादीच दीपा किंवा प्रणती नायक का आढळते असे विचारले असता ती म्हणाली, ‘माझ्यामध्ये तशी ओढ होती, प्रणतीची बाबही तशीच आहे’.

मला सध्याच्या जिम्नॅस्टच्या पिढीमध्ये हा ‘जुनून’ फारसा दिसत नाही. मला वाटते की, ते अल्पकालीन, झटपट यश शोधतात, असे वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनतर्फे आयोजित ‘बियाँड द फिनिश लाइन’ या कार्यक्रमातील एका चर्चेदरम्यान ती म्हणाली. 2016 च्या रिओ गेम्सच्या व्हॉल्ट फायनलमध्ये चौथ्या स्थानावर राहून त्रिपुराच्या 31 वर्षीय अल्पवयीन मुलीने केवळ 0.15 गुणांनी ऑलिम्पिक पदक गमावले.

आगरतळा येथील दीपा ही जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासातील केवळ पाच अशा महिलांपैकी एक आहे जिने प्रोडुनोव्हा यशस्वीरीत्या अंमलात आणला. या प्रकारात लँडिंगपूर्वी दोन समरसॉल्ट्सचा समावेश असतो आणि त्यात दुखापत होण्याची भरपूर जोखीम राहत असल्याने त्याला ‘वॉल्ट ऑफ डेथ’ म्हटले जाते. राष्ट्रीय महासंघाच्या समस्या देखील भारतीय जिम्नॅस्टिक्सला बाधलेल्या आहेत, असे तिने सांगितले. ‘साई आणि फेडरेशनमध्ये समस्या होती. उदाहरणार्थ गेल्या आशियाई खेळांसाठी निवडीचे निकष प्रत्यक्ष चाचण्यांनंतरच कळले. मला भारतीय जिम्नॅस्टिक्समध्ये बदल घडवून आणायचे आहेत. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत. परंतु मी हे एकट्याने करू शकत नाही’, असे तिला भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता ती म्हणाली.

Advertisement
Next Article