For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडचडे वासनाकांड ‘सीआयडी’कडे

03:06 PM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुडचडे वासनाकांड ‘सीआयडी’कडे
Advertisement

प्रकरणाची व्याप्ती, गांभीर्यामुळे पोलिसांचा निर्णय: सोहम नाईकची वैद्यकीय तपासणी पूर्ण : अनेकांच्या जबान्या नोंद, निष्पक्ष तपासाची ग्वाही

Advertisement

कुडचडे : कुडचडे परिसरात खळबळ माजविलेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सोहम नाईक याची उर्वरित वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. तसेच सोहमवर आणखी दोन गुन्हे दाखल केल्याचे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली आहे. बाल हक्क संरक्षण आयोग कुडचडेप्रकरणी लक्ष ठेवून असून तपास अधिकारी तसेच दक्षिण गोवा बाल कल्याण समितीस योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असे आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुणाजी यांनी सांगितले.

राज्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी काल मंगळवारी या प्रकरणाच्या अनुषंगाने कुडचडे पोलिसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता पाहता पुढील संपूर्ण तपास गुन्हा अन्वेषण विभागामार्फत केला जाईल. या घटनेमुळे कुडचडे परिसरात सध्या भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे. जनतेमध्ये सुरक्षिततेबाबत निर्माण झालेली धास्ती आणि प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होण्याची गरज लक्षात घेऊन पोलिस खात्याने हा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

स्थानिक गटाची पोलिसस्थानकात धाव

तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवल्याचे समजताच कुडचडेतील एका स्थानिक गटाने पोलिसस्थानकावर धाव घेतली. हा तपास अचानक सदर विभागाकडे वर्ग करण्यामागचे कारण त्यांनी पोलिसांना विचारले. त्यावर, हा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेला असून त्या आदेशानुसारच प्रक्रिया पार पडत आहे, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. या उत्तरानंतर तो गट पोलिस स्थानकातून निघून गेला.

दोन प्रकरणावरुन सोहमवर आणखी दोन गुन्हे नोंद

या प्रकरणात संशयित आरोपी सोहम नाईक याच्या विरोधात आणखी दोन गुन्हे नोंद केल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात जी माहिती मिळाली आहे. त्या आधारे हे दोन नवीन गुन्हे नोंद झाले आहेत. या प्रकरणात बळी पडलेल्या मुलींनी पोलिस तक्रार नोंद करण्यासाठी पुढे यावे, त्यांची नावे व इतर सर्व माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याची माहिती अधीक्षक संतोष देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित आरोपी सोहम नाईक याने एका मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले, यावेळी त्याने व्हिडिओ शुटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अन्य एका मुलीचे लैंगिक शोषण करून तिचेही व्हिडिओ शुटिंग करण्यात आले. या दोन प्रकारामुळे त्याच्या विरोधात आणखीन दोन अतिरिक्त गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोहम नाईक याला चार दिवसांची पोलिस कोठडी घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार देण्यात आलेल्या पीडिता व इतरांच्या जबान्या घेणे सुरू आहे. पीडितांच्या वयाचीही पडताळणी केली जाणार आहे. एकूण याप्रकरणी सखोल तपास केला जाणार आहे. तपासात जशी नवी माहिती पुढे येणार त्यावरून गरज पडल्यास याप्रकरणांत आणखी कलमे समाविष्ट केली जाणार किंवा नवा एफआयआरही नोंदवणार असल्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले. या कथिक लैंगिक शोषण प्रकरणात सोहम नाईक सोबत अन्य कुणी गुंतला आहे. याचा देखील तपास पोलिस करीत आहेत. सोहम याला या प्रकरणी अन्य कुणी मदत केली असल्यास त्यालाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोलGovernment is impossible without your support

कुडचडेतून उघडकीस आलेल्या वासनाकांड प्रकरणावरून ‘आप‘चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात असल्याचा हा पुरावा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणात भाजपच्याच एका नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग असणे व  तीन वर्षांच्या कालावधीत त्याच्याकडून तब्बल 30 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होणे, त्याही पुढे जाताना त्यांचे चित्रीकरण करून ब्लॅकमेल करणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. भाजपमध्ये असे क्रूर वृत्तीचे लोक आहेत ते पाहता या पक्षाने गोव्यातील लोकांचे जीवन नरक बनवले आहे. सध्या प्रत्येकजण भीती आणि दहशतीच्या छायेखाली जगत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.