For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Paithani Saree News | बनावट पैठणीला लगाम! आता एका क्लिकवर कळणार पैठणी अस्सल की बनावट

10:48 AM Aug 31, 2026 IST | NEETA POTDAR
paithani saree news   बनावट पैठणीला लगाम  आता एका क्लिकवर कळणार पैठणी अस्सल की बनावट
Advertisement

Paithani Saree News | -पैठणी साडीची अस्सलता ग्राहकांना सहज ओळखता याबी आणि बनावट पैठणीच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी शासनाने पैठणीवर बारकोड छापण्याचा निर्णय घेतला आहे. या बारकोडच्या माध्यमातून पैठणी खरी आहे की खोटी याची माहिती ग्राहकांना मिळण्यास मदत होणार

Advertisement

ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णयअसल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर माहिती दिली.

पैठणी ही महाराष्ट्राची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्णओळख असून, तिच्या नावावर बाजारात बनावट साड्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच अस्सल पैठणी तयार करणाऱ्या विणकर व उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी पुढे आणली आहे. शासनाने बारकोडची संकल्पनापैठणीवर छापण्यात येणाऱ्या बारकोडमुळे संबंधित साडीची ओळख आणि अस्सलतेची पडताळणी करण्यास मदतहोणार आहे.

Advertisement

त्यामुळे ग्राहकांना पैठणी खरेदी करताना अधिक विश्वासार्हता मिळेल, तसेच अस्सल पैठणीच्या बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.