For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संस्कृती-परंपरा भारतीयांचा अविभाज्य घटक

06:55 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
संस्कृती परंपरा भारतीयांचा अविभाज्य घटक
Advertisement

आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचे होनियाळमध्ये प्रतिपादन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय संस्कृती आणि परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. आधुनिक युगातही आध्यात्मिक मूल्ये जपत आपण वाटचाल करीत आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे माजी मंत्री व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement

होनियाळ, ता. बेळगाव व पंतनगर परिसरातील नागरिकांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री महागणपती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण, ब्रह्मकलशाभिषेक आणि महापूर्णाहुती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, समाजात संस्कृती, परंपरा, धार्मिक आचार-विचारांना मोठे महत्त्व आहे. संस्कृती आपल्या जीवनात खोलवर रुजलेली आहे. देव, धर्म, संत-महंत, धार्मिक परंपरांबद्दल भारतीयांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास खोलवर रुजलेला आहे. एआयच्या युगात आधुनिकतेचा स्वीकार करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्ये विसरलेले नाहीत. हीच संस्कृतीची खरी ताकद आहे.

आपल्या राजकीय जीवनात पदापेक्षा आपण जनसेवेला अधिक महत्त्व दिले आहे. सुरुवातीपासूनच लोकांची कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. या मतदारसंघाची मुलगी म्हणूनच नागरिकांनी सांगितलेली कामे पूर्ण करण्याचे आपण प्रयत्न केले आहेत. यापुढेही विकासासाठी सातत्याने आपले प्रयत्न सुरूच राहणार आहेत. आपण केवळ बोलून स्वस्थ बसत नाही. होनिहाळ गावात सैनिकांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचे आश्वासन यापूर्वीच आपण दिले आहे. त्याला आपण बांधील असून ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी श्री सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्री बसवराजदेवरू ब्रह्ममठ होनियाळ, कृष्णा तेनगी, बसनगौडा पाटील, नागेश देसाई, रवी मठद, भरमा कटबुगोळ, नागाप्पा कटबुगोळ, सुरेश नावी, महाबळेश्वर बुडकट्टी यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.