तेंडोली-आवेरे येथे १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम
वार्ताहर/ कुडाळ
तेंडोली-आवेरे येथील सावरीश्वर मित्र मंडळ च्या वतीने दिपावली निमित्त १७ ते 20 नोव्हेंबर याकालावधीत तेथीलच सावरीश्वर मंदिर नजीक विष्णू मंदिर समोर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
१७ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तिर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता उदघाटन कार्यक्रम, ८.३० वाजता आंदुर्लाई फुगडी ग्रुप (आंदुर्ले) यांची फुगडी, ९ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिके :- मोठा गट प्रथम क्रमांक 3000 रुपये द्वितीय 2000, तृतीय 1000 लहान गट :- १ ते १६ वर्ष प्रथम क्रमांक 1500 रुपये, द्वितीय 1000 रुपये, तृतीय 500 रुपये अशी आहेत. तसेच विजेत्या स्पर्धेकांना चषक देण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धेकांना प्रमाणापत्र देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धेकांनी 15 नोव्हेंबर पर्यंत अनिल भगत व केतन शिरोडकर मोबाईल नंबर ७५५८३५१५४० यांच्याकडे नाव नोंदणी करावी.
१८ रोजी दुपारी २ वाजता मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप, सायंकाळी 7 वाजता उत्कर्ष दांडिया ग्रुप, वेंगुर्ले यांचा दांडीया नृत्य, रात्री 8 वाजता आरोलकर दशावतार मंडळ (आरवली ) चे 'शिव महिमा' नाटक होणार आहे.१९ रोजी सायंकाळी ७ वाजता कुलदेवता दांडीया ग्रुप (आवेरे) चे दांडीया नृत्य, रात्री 8 वाजता युवा प्रतिष्ठान पिंगुळी-करगुंटकरवाडी व केतन शिरोडकर यांचा शिगमोत्सव कार्यक्रम होणार आहे. २० रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तिर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे 'अघोरी लक्ष्मी' नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.