मळगाव खानोलकर वाचनालयात सांस्कृतिक कार्यक्रम
12:02 PM Dec 07, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
१२ डिसेंबरला स्व.उदय खानोलकर जयंतीचे औचित्य
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावतर्फे ग्रंथालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात स्व.उदय रमाकांत खानोलकर जयंती दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात स्व.उदय यांच्या सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलावंत श्री.नारायण आसयेकर हे कले विषयी विवेचन करुन दशावतार कलेचे सादरीकरण आहेत.कार्यक्रमाला.मळगावचे सुपूत्र श्री.डॉ.एम.के.उर्फ आबा गांवकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला नाट्यप्रेमी,वाचन प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानोलकर वाचन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
Advertisement
Next Article