कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गावच्या विकासासाठी विकास निधी उपलब्ध करुन देऊ : मनीष दळवी

03:10 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मळेवाड येथे सांस्कृतिक महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आणि युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित सांस्कृतिक महोत्सव 2025 चा जिल्हा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.मळेवाड येथील राणी पार्वती देवी विद्यालय मुळेवाड केंद्र शाळा नंबर एक च्या भव्य पटांगणावर ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे कडून सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना मनीष दळवी यांनी गावांमध्ये पाच दिवसीय सासरी कार्यक्रम आयोजन करणे हे फार मोठे काम आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या सासरी कार्यक्रमाचे आयोजन केले असून या वर्षीची भव्य दिव्यता ही वाखडण्याजोगी आहे. गावाच्या विकासासाठी आपण विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दळवी यांनी दिले दळवी यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट,अमोल नाईक,स्नेहल मुळीक,कविता शेगडे,सानिका शेवडे, अर्जुन मुळीक,मधुकर जाधव,अमित नाईक,माजी पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,पोलीस पाटील बाबुराव मुळीक,केंद्रप्रमुख श्री.ठाकूर,तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट,भाजप बांदा मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर,मळेवाड बूथ प्रमुख अध्यक्ष वैभव मोरुडकर,शिवसेना शाखाप्रमुख अमित नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # malewad # sindhudurg news# konkan update
Next Article