कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिपळुणात काकडी, चिबुड विक्रीतून लाखोची उलाढाल

01:17 PM Sep 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या कळंबडे गावातून शहरात विक्रीसाठी आणलेल्या काकडी, चिबुडासह भाजीपाल्याला गणेशोत्सवात मोठी मागणी होती. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली असून या माध्यमातून ग्रामीण भागातील माहिलांना आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीतही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काकडी-चिबुडाची आवक सुरू असून मागणीही चांगली आहे.

Advertisement

शहरापासून काही अंतरावर असलेले कळवडे गाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक हंगामानुसार येथील महिला भाजीसह काकडी, चिबुड शहर बाजारपेठेत विक्रीसाठी आणत असतात. त्यापैकी काकडी, चिबुड ही या गावाची विशेष ओळख असून नागरिक आवर्जून त्यांची वाट पाहत असतात.

या गावातील पुरुषवर्ग मोलमजुरीची कामे करतात. तर महिलवर्ग शिवारात भाजीची लागवड करतात. साधारणपणे शेतीची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर काकडी, चिबुडासह भेंडी, पडवळ, दोडकी, भोपळा, कारली याची देखील लागवड केली जाते. या भाज्या बहरल्यानंतर महिला त्या शहरात विक्रीसाठी आणतात, गणेशोत्सवाच्या काही दिवस आगोदर शहर बाजारपेठेत काकडी, चिबुड दाखल झाले होते. यास विशेष मागणी असल्याने संपूर्ण बाजारपेठेत काकडी, चिबुडाची आवक गणेशोत्सवात वाढली होती. यामुळे या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने महिलांना आर्थिक हातभार लाभला.

गणेशोत्सवानंतरही काकडी, चिबुडाची आवक कामय असून सद्यस्थितीत चिंचनाका, मध्यवर्ती बसस्थानक, भेंडीनाका, जुना बसस्थानक, मार्कडी आदी ठिकाणी विक्री होत आहे. बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच या महिला डोक्यावर टोपली घेत घराघरात जाऊन काकडी, चिबुडासह भाज्याची विक्रीत करत आहेत. सद्यस्थितीत काकडी, चिबुडाचे दर ५० ते १२० रुपयांपर्यंत आहे. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या चिबुडाच्या खरेदीसाठी आवर्जून काही नागरिक पसंती दर्शवतात तर काहीजण खरेदीच्या किंमतीवरुन घासाघीस करत असल्याचे चित्र दिसते.

दरम्यान, या महिलांची भाजीपाला विक्रीसाठी शहर बाजारात स्वतंत्र जागा मिळावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी आहे. या मागणीसंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी निव्वळ आश्वासने दिली. मात्र त्यावर कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नसल्याने यामुळे आजही या महिला ऊन, पावसात आणलेल्या कृषी उत्पादनांची विक्री करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article