क्यूबच्या आकाराची कवटी
1400 वर्षांपूर्वीची कवटी आढळली मेक्सिकोत
मेक्सिकोत पुरातत्वतज्ञांना उत्खननादरम्यान एक अत्यंत अजब गोष्ट मिळाली आहे. येथे 1400 वर्षे जुनी एक मानवी कवटी मिळाली असून याचा आकार गोल नव्हे तर चौकोनी (क्यूबसारखा) आहे. हा शोध ‘बालकोन डी मोंटेजुमा’ नावाच्या ठिकाणी लागला आहे. या भागातील लोक शतकांपूर्वी डोक्याचा आकार बदलण्याच्या प्रथेचे पालन करत होते याचा हा पहिला पुरावा असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. याला विज्ञानाच्या भाषेत ‘क्रेनियल मॉडिफिकेशन’ म्हटले जाते. तर मिळालेली कवटी एका प्रौढ पुरुषाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या शोधामुण्s प्राचीन मेसोअमेरिकन संस्कृतीच्या रीति-रिवाजांवर नवा प्रकाश पडला आहे. संशोधकांनुसार शिराला असा आकार देण्यासाठी बालपणीच त्याला विशेष पद्धतीने दाबले जात होते.
सर्वसाधारणपणे प्राचीन संस्कृतींमध्ये शिराला लांब किंवा शंकूचा आकार देण्याचे चलन होते. अशा कवट्या पाहण्यास एलियन्ससारख्या वाटतात. त्यांना कपडे किंवा पट्ट्यांनी बांधून लांब केले जात होते. परंतु बालकोन डी मोंटेजुमामध्ये मिळालेले हे अवशेष अत्यंत वेगळे आहेत. बायोलॉजिकल एंथ्रोपोलॉजिस्ट जीसस अर्नेस्टो वेलास्को गोंजालेज यांनी या व्यक्तीच्या शीराचा वरिल हिस्सा चपटा करण्यात आला होता, यामुळे त्याच्या कवटीला एक चौकोनी किंवा क्यूबसारखा लुक मिळाल्याचे सांगितले आहे.
तज्ञ याला ‘पॅरेललपाइप्ड’ आकार ठरवत आहेत. शीरामागे आणि पुढे नरम पॅडिंग लावून दबाव टाकण्यात आला असावा. अशाप्रकारचे इरेक्ट मॉडिफिकेशन या भागात यापूर्वी कधी पाहिले गेले नव्हते. अशाप्रकारची चपटी कवटी असलेले लोक हे वेराक्रूज किंवा माया क्षेत्रात आढळून येत होते. याचमुळे हा व्यक्ती बहुधा बाहेरून आला असावा असे वैज्ञानिकांना वाटले. सत्य जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एक खास टेस्ट केली. त्यांनी हाडे आणि दातांच्या केमिस्ट्रीची तपासणी केली. यात चकित करणारा खुलासा झाला आहे.
हा व्यक्ती अन्य ठिकाणावरून आला नव्हता. त्याचा जन्म याच भागात झाला होत. त्याने स्वत:चे पूर्ण जीवन येथेच घालविले आणि येथेच त्याचा मृत्यूही झाला. याचा अर्थ शीराला आकार देण्याची ही प्रथा स्थानिक स्तरावरही अवलंबिण्यात आली होती. या व्यक्तीच्या शीराला असा अजब आकार का देण्यात आला होता याचा शोध संशोधन अद्याप लावू शकलेले नाहीत. मेसोअमेरिकेच्या अनेक हिस्स्यांमध्ये शीराचा वेगवेगळा आकार सांस्कृतिक समुहांची ओळख असायचा. हा कुठल्याही विशेष समुदाय किंवा प्रतिष्ठेला दाखविण्याची पद्धत असू शकतो.
बालपणी व्हायचे काम
हा व्यकत स्थानिक होता, परंतु ज्या लोकांनी त्याचे शीर दाबले होते, ते एखाद्या वेगळ्या सांस्कृतिक समुहाने प्रभावित असण्याची शक्यता आहे. हे काम बालपणीच केले जात होते, जेव्हा हाडं नरम असायची असा वैज्ञानिकांचा अनुमान आहे. ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ एंथ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री’ने याप्रकरणी अद्याप तपासणी सुरु असून यातून त्या काळातील लोकांविषयी आणखी माहिती मिळेल असे सांगितले आहे.
क्रेनियल मॉडिफिकेशन
बालपणी सुरुवात : ही प्रक्रिया मूल अत्यंत लहान असताना सुरू व्हायची. त्या काळात शीराचे हाडं अत्यंत नरम असते आणि त्यांना सहजपणे वळविले जाऊ शकते.
कशी व्हायची प्रक्रिया : शीराच्या चहुबाजूला लाकडी पट्टी, कपडे किंवा दोरखंड कसून बांधले जायचे. अनेक महिने किंवा वर्षांपर्यंत त्यांना तसेच ठेवले जायचे.
उद्देश काय होता : हा बहुधा सुंदरतेचा निकष होता, अनेकदा हा समाजात वरचा दर्जा किंवा एखाद्या खास समुदायाच्या ओळखीसाठी देखील केले जात होते.
मेंदूवर परिणाम : वैज्ञानिकांनुसार यामुळे शीराचा आकार बदलत होता, परंत यामुळे मानवी मेंदूची क्षमता किंवा बुद्धिमतेवर कुठलाच प्रतिकूल प्रभाव पडत नव्हता.
बालकोन डी मोंटेजुमा हे मेक्सिकोच्या तमाउलिपास राज्यातील एक प्रमुख पुरातत्वस्थळ आहे. सिएरा माद्रेच्या पर्वतांमध्ये वसलेले हे स्थान स्वत:च्या प्राचीन गोलाकार दगडी संरचनांसाठी ओळखले जाते. येथे 400 ते 1200 सालादरम्यान संस्कृती बहरली होती. अलिकडेच येथे मिळालेल्या 1400 वर्षे जुने चौकोनी कवटीने याला जगभरात चर्चेचा विषय केले आहे.