For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ममी’चे सिटीस्कॅन

06:31 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ममी’चे सिटीस्कॅन
Advertisement

इजिप्तमधील पुरातन ‘ममी‘ज किंवा पुरलेले मृतदेह हा गेल्या 200 वर्षांपासून मानवाच्या संशोधनाचा एक स्वारस्यपूर्ण विषय राहिला आहे. या ‘ममी’जचे जितके संशोधन करावे, तितकी त्यांच्यातून नवी नवी रहस्ये बाहेर पडतात आणि तत्कालीन मानवी जीवनाविषयी आत्ताच्या मानवाच्या ज्ञानात भर पडत जाते. अशाच प्रकारे त्यांच्यावर संशोधन होत असताना, 2 सहस्र वर्षांपूर्वीच्या एका ‘ममी‘चे सिटीस्कॅन करावे, असे काही संशोधकांच्या मनात आले आणि त्यांनी त्वरीत त्याप्रमाणे कृती केली. सिटीस्कॅनच्या अहवालातून जे सत्य समोर आले, त्यामुळे संशोधकही आश्चर्यचकित झाले आहेत. अशा दोन ममीजचे स्कॅनिंग करण्यात आले. एक ममी इसवी सन पूर्ण 330 वर्षांची तर दुसरी इसवी सन पूर्व 190 वर्षांची आहे. त्यांच्या स्कॅन अहवालातून असे दिसून आले, की आजचा मानव आणि त्यावेळचा मानव यांच्यातील बऱ्याच शारिरीक रचना समसमान आहे. इतकेच नव्हे, तर या ममीज ज्या व्यक्तींच्या होत्या त्यांना कोणते विकार होते आणि कशामुळे त्यांचा मृत्यू झाला, याचीही माहिती मिळाली आहे. एका ममीला पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागात दुखण्याचा (लोअर बॅक पेन) विकार होता. तर दुसऱ्या ममीला तीव्र संधीवाताचा विकार होता. आजही माणसाला वाढत्या वयानुसार हे विकार होतात आणि ते सर्वसामान्य आहेत. अनेकांना ते होतात. त्यावेळीही अशीच स्थिती होती, हा रहस्यभेद संशोधकांसाठी महत्वाचा ठरत आहे.

Advertisement

त्यावेळचे लोक आजच्या मानवाप्रमाणे अनेक गंभीर विकारांनी पिडीत होते. अनेक रोगांचे उद्रेक त्यांना सहन करावे लागत होते. गुढघेदुखी, हाडांच्या समस्या, मेंदूचे विकार, संधीवात आदी समस्या त्या वेळच्या मानवाच्या वाट्याला वाढत्या वयात येत होत्या. आजही अशीच स्थिती आहे. त्यावेळच्या मानवाचा आणि आजच्या  मानवाचा वृद्धापकाळ साधारणत: सारखाच त्रासदायक होते, असे दिसते. याचाच अर्थ कसा की, साधारणत: गेल्या 15 हजार वर्षांपासून मानवाची जीवनशैली समान असून तिच्यात फारसे अंतर पडलेले नाही, हे सत्य समोर आले. या संशोधनाचा उपयोग सध्याच्या मानवाची शारिरीक स्थिती जाणण्यासाठी अधिक प्रमाणात होणार आहे, तसेच पुरातन काळी हे विकार सुसह्या करण्यासाठी कोणते उपाय करण्यात येत होते, याचीही माहिती या संशोधनातून उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.